'सकाळ'मुळे गावे पाणीदार होण्यास मोलाची मदत - हर्षवर्धन पाटील

राजकुमार थोरात
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

इंदापूर तालुक्यामध्ये सकाळ रिलिफ फंडातून गेल्या चार-पाच वर्षामध्ये अनेक गावामध्ये ओढा खोलीकरण व रुंदीकरणाची कामे झाली.या कामाचा फायदा त्या गावातील शेतकऱ्यांना होत आहे.

वालचंदनगर - 'सकाळ' माध्यम समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार व व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्यामुळे इंदापूर तालुक्यातील गावे पाणीदार होत असल्याचे गौरवउद्गार माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

रणगाव (ता. इंदापूर) येथे सकाळ रिलिफ फंड, पाणी फाउंडेशन व रणगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या ओढाखोलीकरण व रुंदीकरण करणाचा शुभारंभ माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाटील यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यामध्ये सकाळ रिलिफ फंडातून गेल्या चार-पाच वर्षामध्ये अनेक गावामध्ये ओढा खोलीकरण व रुंदीकरणाची कामे झाली.या कामाचा फायदा त्या गावातील शेतकऱ्यांना होत आहे. गावामध्ये पाण्याची पातळी वाढली असून पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी झाली आहे. सकाळ माध्यम समुहामुळे इंदापूर तालुक्यामध्ये जलक्रांती होवू लागली असून गावेच्या गावे पाणीदार झाली आहेत. चालू वर्षी सकाळ माध्यातून तालुक्यातील दहापेक्षा जास्त गावामध्ये ओढा खोलीकरणाचा उपक्रम सुरु असल्याचे सांगितले. यावेळी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, तालुकाध्यक्ष कृष्णाजी यादव, कर्मयोगीचे संचालक राजेंद्र गायकवाड, अर्बन बॅंकेचे संचालक सत्यशिल पाटील, राहुल रणमोडे सरपंच सुषमा राहुल रणमोडे, उपसरपंच निता तेलगे, 'सकाळ'चे वालचंदनगरचे बातमीदार राजकुमार थोरात उपस्थित होते.

श्रमदानामध्ये सहभाग घ्या- पाटील

यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यातील ३७ गावांनी पाणी फाउंडेशनच्या वाॅटरकप स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे.स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या गावातील जास्तीजास्त नागरिकांनी श्रमदानामध्ये सहभाग घेवून जलसंधारणाची कामे करण्याचे आवाहन केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Sakal media helps for water conservation in Indapur taluka