टेम्पो उलटल्याने बुलडाणा जिल्ह्यातील ३० वारकरी जखमी 

गणेश बोरुडे
शनिवार, 17 जून 2017

देहुजवळील भंडारा डोंगर (ता. मावळ,पुणे) घाटातील वळणावर आज दुपारी 3 च्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार तालुकयातील वारकऱ्यांचा टेंम्पो पलटी होऊन,३० वारकरी जखमी झाले.पैकी २ गंभीर जखमी असून सर्वांवर तळेगाव दाभाडे येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

तऴेगाव स्टेशन- देहुजवळील भंडारा डोंगर (ता. मावळ,पुणे) घाटातील वळणावर आज दुपारी 3 च्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार तालुकयातील वारकऱ्यांचा टेंम्पो पलटी होऊन,३० वारकरी जखमी झाले.पैकी २ गंभीर जखमी असून सर्वांवर तळेगाव दाभाडे येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

आजच्या आळंदीतील ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीबरोबर पंढरपूरला जाण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील गणपूर तसेच आणि लोणार तालुक्यातील शहारा,बटाळा आदी गावांतील वारकरी टेम्पो क्र.एमएच-२८ बी.९८८१ मध्ये बसून,श्री क्षेत्र देहू येथून दर्शन घेऊन श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर आले होते.दर्शन घेऊन परतत असताना घाट उतरताना चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पो कठड्याला धडकून उलटला.त्यात टेम्पोमध्ये बसलेले दोघे गंभीर तर इतर २८ जण किरकोळ जखमी झाले.सुदैवाने टेम्पो दरीत कोसळण्यापासून वाचला आणि जीवितहानी झाली नाही.अभिनव शिंदे(०९) ,बाळा अशोक शिंदे (२०),कांताबाई बचाटे(५०),बाबुराव साहेबराव ठोकरे (६२),विश्वनाथ परशुराम साखरकर (५५);लक्ष्मण शामराव नाळेगावकर(६०) सर्व राहणार शहारा-बटाळा ता.लोणार जि.बुलढाणा तसेच चालकासह इतर २४ जण जखमी झाले.घटनेची माहिती कळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस वाल्मिक अवघडे आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत रुग्णवाहिकेद्वारे जखमींपैकी १७ जणांना तऴेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटल तर उर्वरित १३ जणांना सोमाटणे फाटा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.

Web Title: sakal news breaking news dehu accident