पीएमपीची चिल्लर स्वीकारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पुणे - पीएमपीकडे दोन महिन्यांपासून पडून असलेल्या चिल्लरवर तोडगा काढण्यासाठी पीएमपी प्रशासनाने रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाला (आरबीआय) मध्यस्थी करण्याची विनंती केली होती. त्यावर रिझर्व्ह बॅंकेने सेंट्रल बॅंक आणि पीएमपी यांच्याबरोबर नुकतीच बैठक घेतली होती. पण, निर्णय झाला नव्हता. यासंबंधीचे वृत्त ‘सकाळ’ने गुरुवारी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने आज शुक्रवारी (ता. ७) पत्रकाद्वारे पीएमपीकडील चिल्लर स्वीकारण्याचे आदेश सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाला दिले आहेत.

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने पीएमपीकडून चिल्लर स्वीकारण्यास ४ ऑक्‍टोबरपासून नकार दिला होता. त्यानंतर लाखो रुपयांची चिल्लर तशीच पडून होती. त्यामुळे पीएमपीच्या दैनंदिन व्यवहारामध्ये अडचणी येत होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी पीएमपीने रिझर्व्ह बॅंकेकडे मागणी केली होती. पण, रिझर्व्ह बॅंकेने ठोस भूमिका घेतली नव्हती. ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने सेंट्रल बॅंकेला पत्राद्वारे पीएमपीकडून येणारी सर्व चिल्लर स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पीएमपीने शक्‍य होईल, तेवढी कमी रक्कम बॅंकेत भरावी, असेही सांगितले आहे. यासंबंधीचे पत्र रिझर्व्ह बॅंकेने आज शुक्रवारी (ता. ७) पीएमपी प्रशासनाला दिले आहे. या निर्णयाचे पीएमपीकडून स्वागत करण्यात आले असून, रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या  आदेशांचे पालन करण्यात येईल, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: sakal news impact Accept the PMP coin