भीतीचे साहसात रूपांतर करा : विश्वास नांगरे पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

शिकणं हे तुमच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक समजा ! शिक्षण कधीही थांबवू नका. ते तुम्हाला नेहमीच मार्ग दाखवेल... आपली पॅशन आणि आपलं काम एकच असलं, तर आयुष्य आनंदी होणं कठीण नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, भीतीचे साहसात रूपांतर करा. खंबीर राहा. यश तुमचंच आहे..." अशा प्रेरणादायी शब्दांत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.'सकाळ'च्या ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आयोजिलेल्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’च्या उदघाटनप्रसंगी रविवारी नांगरे बोलत होते.

पुणे : " शिकणं हे तुमच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक समजा ! शिक्षण कधीही थांबवू नका. ते तुम्हाला नेहमीच मार्ग दाखवेल... आपली पॅशन आणि आपलं काम एकच असलं, तर आयुष्य आनंदी होणं कठीण नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, भीतीचे साहसात रूपांतर करा. खंबीर राहा. यश तुमचंच आहे..." अशा प्रेरणादायी शब्दांत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.'सकाळ'च्या ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आयोजिलेल्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’च्या उदघाटनप्रसंगी रविवारी नांगरे बोलत होते. 'सकाळ'च्या ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व्यासपीठाने आयोजिलेल्या ‘यिन समर यूथ समिट २०१७’च्या उदघाटनप्रसंगी रविवारी करमळकर बोलत होते. या वेळी ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’चे डॉ. संजय चोरडिया, ‘निलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’चे निलय मेहता, जेएसपीएमचे विजय सावंत आदी उपस्थित होते.

नांगरे पाटील म्हणाले, " स्वामी विवेकानंद म्हणतात तसे एक कल्पना उचलून तुम्ही त्यावर स्वतःला झोकून द्या. चिकाटी आणि साधनेतून यश मिळणे निश्चित आहे. महत्त्वाचे म्हणजे वाचनाची सोबत कधीही सोडू नका. प्रेरणेसाठी पुस्तकासारखा मित्र नाही !" यावेळी बोलताना कुलगुरू करमळकर म्हणाले, 'आपल्यातील बलस्थाने ओळखा. आपल्याला पुढे काय करायचे आहे, हे ठरावा आणि एक निश्चित ध्येय घेऊन पुढे जात राहा. पण लक्षात ठेवा- कधीही शॉर्टकट्स पकडू नका. खऱ्या यशासाठी शॉर्टकट्स कधीही उपयोगी ठरत नाहीत..."

दरम्यान, आपल्या प्रेरणास्थान असलेल्या वक्त्यांकडून थेट त्यांच्या आयुष्यातील अनुभव ऐकण्यासाठीचा विद्यार्थ्यांमधील वाढता उत्साह, मान्यवरांचे अतीव मोलाचे मार्गदर्शन अन्‌ त्यांच्या व्याख्यानातून मिळणारी न संपणारी ऊर्जा... अशा उल्हासमयी वातावरणात दीपप्रज्वलनानंतर समीट सुरू झाली. त्यानंतर सुतार यांनी प्रास्ताविक केले.

'यिन'च्या स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण

'यिन'च्या स्वयंसेवकांना पुणे ग्रामीण पोलीस तर्फे मर्यादित कालावधीचे विशेष प्रशिक्षण देऊन या तरुणांना अधिक कौशल्य प्राप्त करून देण्याची घोषणा या वेळी विश्वास नांगरे पाटील यांनी केली. 'यिन'च्या स्वयंसेवकांना 'विशेष पोलीस ऑफिसर' म्हणून प्रमाणपत्र दिली जातील, असे ते म्हणाले.

 

 

 

Web Title: sakal news vishwas nagare patil