‘सकाळ एनआयई’ अंकाचे शाळांमध्ये स्वागत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सकाळ एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन) या उपक्रमाला शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘सकाळ एनआयई’च्या पहिल्या विशेषांकाचे प्रकाशन व वितरण शाळानिहाय मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आले. या विशेषांकाचे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. 

‘सकाळ एनआयई’च्या वतीने शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम राबविले जातात. महाराष्ट्रातील सुमारे पाचशे शाळांमधून पन्नास हजार विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. एका शैक्षणिक वर्षात १८ विशेषांकांचे वितरण केले जाते. त्यासोबत मनोरंजनातून शिक्षणाच्या विविध कार्यशाळांचेही शाळानिहाय आयोजन करण्यात येते. ‘एनआयई’ अंकात विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक प्रयोग, शब्दकोडे, कथा, किड आयकॉन, अराइंड द वर्ल्ड, गिनेस बुक आदी विविध बौद्धिक माहिती देणाऱ्या सदरांचा समावेश असणार आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर, जुन्नर, आंबेगाव, मावळ, बारामती, भोर या तालुक्‍यांतील विविध शाळांचा यात सहभाग आहे.

मुख्याध्यापकांना आवाहन
‘सकाळ एनआयई’ या विद्यार्थिप्रिय उपक्रमाची शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी सभासद नोंदणी सुरू असून, इच्छुक शाळांच्या मुख्याध्यापकांनी हा उपक्रम आपल्या विद्यालयात सुरू करण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या ‘सकाळ’ कार्यालयाशी अथवा ९९२२९१३४७३, ८३७८९९३४४६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: sakal nie edition welcome in school