शिक्षकांना मिळाला शिकवण्याचा कानमंत्र 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

पुणे - लहान मुलांना शिकविताना शिक्षकांनी रंजकता आणायला हवी. विज्ञानातील क्‍लिष्ट संकल्पना आणि गणितातील आकडेमोड खेळातून विद्यार्थ्यांना समजावून सांगायला हवी. शिकण्याची प्रक्रिया अधिक गतिशील कशी होईल, यावर शिक्षकांनी लक्ष द्यावे, असा कानमंत्र ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ अरविंद गुप्ता यांनी शिक्षकांना दिला. विद्यार्थ्यांना शिकवावे कसे, हे प्रयोगशील पद्धतीने सांगत गुप्ता यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या शिक्षकांची "अभिनव शाळा' घेतली. 

"सकाळ एनआयई' आणि "इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ऍण्ड रिसर्च' (आयआयएसईआर) यांच्या वतीने आयोजित तीन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण व संवाद कार्यशाळेचे उद्‌घाटन गुरुवारी झाले. या वेळी गुप्ता, आयसरचे वरिष्ठ प्राध्यापक आणि विज्ञान प्रसार विभाग प्रमुख एल. एस. शशीधरा, "सकाळ माध्यम समूहा'च्या कार्यकारी संपादक शीतल पवार, "सकाळ एनआयई'चे सहव्यवस्थापक विशाल सराफ उपस्थित होते. शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षण अधिक कृतिशील आणि प्रयोगशील व्हावे आणि त्यातून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन व्हावे, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. 

प्रयोगात्मक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या दिग्गज शिक्षकांच्या गोष्टी सांगत गुप्ता यांनी शिक्षकांना "शिकवायचे कसे,' याचे धडे दिले. 

कार्यक्रमात पवार यांनी कार्यशाळेमागील भूमिका स्पष्ट केली, तर "आयसर'च्या डॉ. अपूर्वा बर्वे यांनी आभार मानले. 

अरविंद गुप्ता यांनी शिक्षकांना दिलेला सल्ला : 
- शिकविणे रोचक बनवा 
- विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेनुसार आणि गतीप्रमाणे शिकू द्या 
- विज्ञान, गणित, व्याकरण खेळातून शिकवा 
- विद्यार्थ्यांचा मित्र होणे आवश्‍यक 

कार्यशाळेत हे मार्गदर्शन करतील 
- शुक्रवारी (ता. 8) : डॉ. अरविंद नातू, मनोज आंबिके, डॉ. आनंद कृष्णन, डॉ. अपूर्वा बर्वे, अशोक रुपनेर, चैतन्य मुंगी, डॉ. अपर्णा देशपांडे, श्रद्धा भुरकुंडे, विठ्ठल शेजवल 
- शनिवारी (ता. 9) : डॉ. प्रदीप आगाशे, डॉ. रामाकृष्णन जी. भट, अपर्णा जोशी, सत्यजित राठ, मकरंद टिल्लू

Web Title: Sakal NIE The teacher got it Teaching Counselor