"सकाळ' तर्फे इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हलचे आयोजन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

पुणे - गोष्टींच्या दुनियेत प्रत्येकजण हरवतो. मुले आणि पालकांसोबतच कथेची आवड असणाऱ्या प्रत्येकाला अनोख्या गोष्टी ऐकायला मिळाव्यात म्हणून "सकाळ माध्यम समूहा'ने शुक्रवार (ता. 18) आणि शनिवारी (ता. 19) "इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल'चे आयोजन केले आहे. 

फेस्टिव्हलचे हे तिसरे वर्षे असून, यामध्ये तब्बल 9 स्टोरी टेलर भन्नाट कथा सादर करणार आहेत. यासाठीचे रजिस्ट्रेशन "सकाळ'चे शिवाजीनगर कार्यालय आणि येरवडा येथील ईशान्य मॉलमध्ये सकाळी 11 ते 5 या वेळेत सुरू आहे. 

या फेस्टिव्हलमध्ये सावलीचे पपेट, पपेट्री, कॉस्च्युम, पेपर स्टोरीज अशा विविध प्रकारांनी कथाकथन होणार आहे. छोट्या मुलांसाठी कथा, तर पालक आणि शिक्षकांसाठी या ठिकाणी वर्कशॉपचेही आयोजन केले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला या फेस्टिव्हलमधून काही ना काही मिळणार आहे. या फेस्टिव्हलसाठी बल्क बुकिंग सुरू झाले असून, शाळा, कॉर्पोरेट आणि कॉलेजेसमध्येही बुकिंग करता येणार आहे. 

"सकाळ' वायआरआयतर्फे पुण्यात येरवडा येथील ईशान्य मॉलमध्ये हा फेस्टिव्हल होणार असून, त्यामध्ये प्रत्येक वयोगटाला वेगवेगळे स्टोरी टेलर गोष्ट सांगणार आहेत. त्यामध्ये प्लेग्रुप ते सीनियर केजीतील विद्यार्थ्यांना जिवा रघुनाथ (भारत) आणि रोझमेरी सोमाह (सिंगापूर), पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांना करेन ली (सिंगापूर) आणि रोझली बेकर अँड टीम (यूएसए), चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना तान्या बॅट, पीटर फोर्स्टर (न्यूझीलंड) आणि च्यूह अ लिन (सिंगापूर), सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना जूम फानिडा (थायलंड) आणि जेफ गेरे (हवाई), तर आठवी व त्यापुढील इयत्तेच्या विद्यार्थ्यांना क्रेग जेनकिन्स हे मान्यवर गोष्ट सांगणार आहेत. या फेस्टिव्हलची सांगता ईशान्य मॉलच्या ऍम्फी थिएटरमध्ये जगभरातील 9 स्टोरी टेलर्सच्या भन्नाट कार्यक्रमाने होणार आहे. हा फॅमिली शो शनिवारी सायं. 5 ते 6.30 या वेळेत होणार असून, तो पालक व मुलांसाठी खुला राहणार आहे. या फेस्टिव्हलचे व्हेन्यू पार्टनर ईशान्य मॉल असून सकाळ पिंपरी, शिवाजीनगर, बुधवारपेठ कार्यालय अणि ईशान्य मॉल, येरवडा येथे नोंदणी सुरू झाली आहे. 

काय : इंटरनॅशनल स्टोरी टेलिंग फेस्टिव्हल 
कधी : 18 आणि 19 नोव्हेंबर 
कुठे : ईशान्य मॉल, येरवडा, पुणे 
मर्यादित जागा 
रजिस्ट्रेशनसाठी : www.yriclub.in 
अधिक माहितीसाठी संपर्क ः 8805009395, 9822078415, 9552533713 
व्हॉट्‌सऍपसाठी क्रमांक ः 9146038033 

रजिस्ट्रेशनसाठी ठिकाणे : 
सकाळ कार्यालय - पिंपरी, शिवाजीनगर आणि बुधवारपेठ 
ईशान्य मॉल, येरवडा 

Web Title: sakal organized by the International Story Telling Festival

टॅग्स