स्वमग्नतेबद्दल जागृतीसाठी मॅरेथॉन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 मे 2018

दीड हजारांहून अधिक जणांचा सहभाग; प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश

पुणे: "सकाळ' आणि "पुणे रनिंग'तर्फे "लास्ट संडे ऑफ मंथ' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने "रन विथ ऑटिझम अवेअरनेस' ही स्वमग्नतेबद्दल जागृतीसाठी मॅरेथॉन घेण्यात आली. त्यात सर्व वयोगटातील सुमारे दीड हजारांहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला. त्यातील 500 जणांनी पहिल्यांदाच यात सहभाग घेतला.

"साद' तसेच "प्रसन्न ऑटिझम सेंटर'मधील विशेष मुलेही यात सहभागी झाली होती. मॅरेथॉनचे उद्‌घाटन सुचेता कडेठाणकर, अंजली भालिंगे, "सकाळ'चे सरव्यवस्थापक (वितरण) डॉ. सुनील लोंढे आणि डॉ. वसुधा गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. श्‍यामराव कलमाडी शाळेतून मॅरेथॉनला सुरवात झाली. "ब्रिंग युवर ओन बॉटल' या अभिनव उपक्रमाची सुरवात या वेळी करण्यात आली. या प्रयोगाद्वारे प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश देण्यात आला. एरवी मॅरेथॉनमध्ये प्लॅस्टिकचे साहित्य वापरले जायचे. त्याचा वापर बंद व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. दुखापत मुक्त धावणे या उद्देशाने ही मॅरेथॉन आयोजिली होती. मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी पाषाण येथे अशीच मॅरेथॉन घेणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.

Web Title: sakal pune running and marathon