'सकाळ रिलीफ'कडून पूरग्रस्तांसाठी आरोग्यसेवा 

sakal-relife-helthcare.jpg
sakal-relife-helthcare.jpg

सांगली : सकाळ रिलीफ फंडातर्फे पूरग्रस्तांना मदत करण्याबरोबर त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा उपक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत पुण्याच्या आरोग्य सेना संस्थेच्या सहकार्याने मिरज, ढवळी, भिलवडी, धनगाव, माळवाडी येथील 1 हजार 800 पूरग्रस्तांची तपासणी करण्यात आली. अडीच लाखांची औषधे वाटण्यात आली. 

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी "सकाळ रिलीफ फंडा'ने एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. रिलीफ फंडासाठी राज्य, राज्याबाहेरून मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. पूरग्रस्तांना विविध प्रकारची मदत करण्याबरोबर "रिलीफ फंडा'च्या वतीने पूरग्रस्त मिरज, ढवळी, भिलवडी, धनगाव आणि माळवाडी परिसरात पूरग्रस्तांची तपासणी करण्यात आली. या ठिकाणी 1 हजार 800 पूरग्रस्तांची तपासणी झाली. संस्थेचे वैद्यकीय पथक तत्पर होते.

आरोग्यसेवा संस्थेचे प्रमुख डॉ. अभिजित वैद्य, डॉ. नितीन केतकर, डॉ. पंडित बोराडे, डॉ. लक्ष्मीकांत मुंदडा, डॉ. आशिश आजगावकर, हणमंत भैरट, विकास मगदूम, वर्षा गुप्ते यांच्या पथकाने तपासणी केली. पूरग्रस्तांचा विविध प्रकारच्या आजारापासून बचाव व्हावा यासाठी 50 प्रकारची सुमारे अडीच लाखांची औषधे वाटली. पुरानंतर कोणती काळजी घ्यावी याबाबत वैद्यकीय पथकाने मार्गदर्शन केले. आज सकाळी ढवळी (ता. मिरज) येथेही सुमारे 500 पूरग्रस्तांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. 

पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’मार्फत अशी करा मदत
सकाळ रिलीफ फंडा’च्या वतीने जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा
पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ’कडे मदतीचा ओघ​
पहिल्या दिवशी दहा लाख रुपयांची मदत जमा ​

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com