कोल्हापूर-सांगलीकडे धान्याचे तीन ट्रक रवाना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

कोल्हापूर व सांगलीमधील पुरामुळे अवघा संसार वाहून गेलेल्या हजारो कुटुंबीयांना सावरण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून विविध स्वरूपात मदत करण्यात येत आहे. पूरग्रस्तांचे संसार उभारण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून एक कोटी रुपयांची मदत यापूर्वीच जाहीर केली आहे. त्याचबरोबर जीवनावश्‍यक वस्तू, अन्नधान्य पूरग्रस्त भागातील लोकांपर्यंत पोचविण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्‍यक ती यंत्रणा ‘सकाळ’कडून उभारण्यात आली आहे.

पुणे - कोल्हापूर व सांगलीमधील पुरामुळे अवघा संसार वाहून गेलेल्या हजारो कुटुंबीयांना सावरण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून विविध स्वरूपात मदत करण्यात येत आहे. पूरग्रस्तांचे संसार उभारण्यासाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडून एक कोटी रुपयांची मदत यापूर्वीच जाहीर केली आहे. त्याचबरोबर जीवनावश्‍यक वस्तू, अन्नधान्य पूरग्रस्त भागातील लोकांपर्यंत पोचविण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्‍यक ती यंत्रणा ‘सकाळ’कडून उभारण्यात आली आहे.

पुण्यातून अन्नधान्याचे तीन ट्रक कोल्हापूर - सांगलीसाठी रवाना करण्यात आले. यामध्ये बारा टन बेसन पीठ, एकवीस टन गव्हाचे पीठ, सोळा टन तूरडाळ, आदी साहित्याचा समावेश आहे. ‘सकाळ रिलीफ फंडा’चे विश्वस्त महेंद्र पिसाळ, राजेश शहा, डॉ. सतीश देसाई, पोपटलाल ओस्तवाल, वालचंद संचेती यांच्या प्रमुख उपस्थितीत तीनही ट्रक कोल्हापूर- सांगलीकडे रवाना करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Relief Fund Help to Flood Affected Grain