पिठेवाडीमध्ये सकाळ रिलिफ फंडातून ओढा खोलीकरणास सुरवात

राजकुमार थोरात
सोमवार, 9 एप्रिल 2018

सकाळ माध्यम समुहाने सुरु केलेल्या ओढा खोलीकरण, रुंदीकरणामुळे गावेच्या गावे पाणीदार होवू लागली आहेत.

वालचंदनगर - पिठेवाडी (ता. इंदापूर) येथे सकाळ रिलिफ फंड व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ओढा खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार दत्तात्रेय भरणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे व झेडपीचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आला.

पिठेवाडी गाव नीरा नदी काठी आहे. मात्र उन्हाळ्यामध्ये गावामध्ये तीव्र पाणी टंचाई असते. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण फिरावे लागते. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न ही गंभीर होत असल्याने येथील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी सकाळ माध्यम समुहाकडे ओढा खोलीकरणासाठी निधी देण्याची मागणी केल्यानंतर सकाळ रिलीफ फंडातून दोन लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. शुभारंभ प्रसंगी आमदार भरणे यांनी सांगितले की, सकाळ माध्यम समुहाने सुरु केलेल्या ओढा खोलीकरण, रुंदीकरणामुळे गावेच्या गावे पाणीदार होवू लागली आहेत. गावातील पाणीटंचाई कमी झाली असल्याचे सांगितले.यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस युवकचे सरचिटणीस वीरसिंह रणसिंग, सरपंच नंदादेवी बंडगर, विजय बंडगर, नवनाथ रूपनवर, दत्तू सवासे, बापूराव वाघमोडे, बळीराम डोंबाळे, दिलीप बंडगर, विजय शेंबडे, ग्रामसेवक सागर सवासे उपस्थित होते.

दुष्काळमुक्तीच्या दिशेने गावांची वाटचाल
सकाळ माध्यम समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार,व्यस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी सकाळ रिलिफ फंडातुन सुरु केलेली ओढी खोलीकरण व रुंदीकरणाची  जलसंधारणाची कामे कौतुकास्पद आहेत. यामुळे पाण्याचे जलस्त्रोत बळकट होण्यास मोलाची मदत होत आहे. सकाळमुळे इंदापूर तालुक्यातील दगडवाडी हे गाव पाणीदार झाले असून पाणीटंचाई कमी झाली आहे. सकाळमुळे दुष्काळमुक्तीच्या दिशेने गावांची वाटचाल सुरु असल्याचे माने यांनी सांगितले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Sakal Relief Fund Helps For Leaning