सकाळ रिलीफ फंडातून पाणी साठवण तलावाचे काम अंतिम टप्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

उंडवडी (पुणे) : उंडवडी सुपे (ता. बारामती) येथे अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी साठवण तलाव (शेततळे) तयार करण्यात येत आहे. नुकतीच या तलावाची पाहणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. 

यावेळी सरपंच एकनाथ जगताप व उपसरपंच पोपट गवळी, ग्रामपंचायत सदस्य अंजना गवळी, रंजना गवळी, रेणुका गवळी, मंगल गवळी, सुनीता माकर, ज्ञानदेव जगताप भगवान माकर, माजी सरपंच बापूराव गवळी, तंटामुक्तीचे अध्यक्ष संजय गवळी, सुनील भोसले, ग्रामसेवक विनोद आटोळे आदी उपस्थित होते. 

येथे ओढा खोलीकरण व गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणी साठवण तलाव व्हावा, यासाठी पोकलेन मशिन व सकाळ रिलीफ फंडाकडून डिझेल  मिळावा, यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार व जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार  यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने पोकलेन मशिन व सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने या पोकलेन माहिनला डिझेलची व्यवस्था करण्यात आली आहे. 

येथे सहाशे मीटर ओढ्याचे खोलीकरण नुकतेच पूर्ण झाले असून येथे गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी तीस बाय तीस मीटर लांबीचा व पाच मीटर खोलीचा पाणी साठवण तलाव तयार करण्यात येत आहे. या तलावाची पन्नास लाख लिटर पाणी साठवण क्षमता होणार आहे. 

सद्या या तलावाचे काम अंतिम टप्यात आले असून या तलावाची पाहणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी  केली. व समाधान व्यक्त केले. तलावाचे काम वेगात सुरु असल्याने येथील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

याबाबत सरपंच एकनाथ जगताप व उपसरपंच पोपट गवळी  म्हणाले, " या तलावामुळे गावाची उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. या तलावात लोकवर्गणी व सामाजिक संस्थेच्या मदतीने प्लास्टिक कागद टाकण्यात येणार आहे. आम्ही पावसाळ्यात वाहून जाणारे पावसाचे पाणी या तलावात साठवून ठेवणार आहे. या तलावातील पाण्यामुळे आमच्या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात शासकीय टॅंकरची आवश्यकता भासणार नाही. असा आम्हाला विश्वास वाटतोय. "

Web Title: sakal relief fund water storage tank construction work in last stage