नवीन नावनोंदणीसाठी उद्यापर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

पुणे - ‘सकाळ’ व सह्याद्री हॉस्पिटलच्या पन्नास वर्षे वयावरील व्यक्तींसाठीच्या ‘सुरक्षा कवच योजने’च्या नवीन सभासद नोंदणीची अंतिम मुदत रविवारी (ता. २४) संपत आहे. प्ले स्टोअरवरून ‘S3K’ हे मोबाईल ॲप डाउनलोड करूनही सदस्यत्व नोंदणी शक्‍य आहे. 

या योजनेतील दीड लाख रुपयांची विमा मर्यादा आता दोन लाखांपर्यंत, तर औषधांसाठीची सवलत १५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविली आहे. याशिवाय विविध वैद्यकीय सेवांवर २० ते ७५ टक्‍क्‍यांपर्यंत सवलत, तज्ज्ञांचा सल्ला, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप कार्ड, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कॅथेटर अँजिओग्राफीसाठी विशेष पॅकेज आदी सुविधांचाही लाभ घेता येणार आहे.

सभासदांना ‘सकाळ’तर्फे आठ दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आस्वाद घेता येईल. योजनेत २००९ पासून एकदाही आंतररुग्ण सेवा न घेणाऱ्या सभासदांसाठी विमा मर्यादा दोन लाख ३० हजार रुपये आहे. सभासदांच्या ५० वर्षे वयाखालील नातेवाइकांना वा परिवारातील व्यक्तींनाही सवलत आहे. नवीन सभासद नोंदणीसाठी निवास व वयाच्या दाखल्याची प्रत देणे आवश्‍यक आहे. 

नोंदणीसाठी हे करा... 
 वय वर्षे ५० ते ६९ साठी : ३५०० रुपयांचा धनादेश ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे अधिक ८०० रुपयांचा धनादेश ‘सकाळ मीडिया प्रा. लि.’ 
या नावाने द्यावा. 
 वय वर्षे ७० व अधिक - ४६०० रुपयांचा धनादेश ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे अधिक ८०० रुपयांचा धनादेश ‘सकाळ मीडिया प्रा. लि.’ या 
नावे द्यावा. 
 नोंदणीशुल्क रोखीनेही भरता येईल. 
 नोंदणीची ठिकाणे - सह्याद्री हॉस्पिटल, डेक्‍कन जिमखाना- कर्वे रस्ता. कोथरूड-पौड रस्ता, वनाजसमोर. बिबवेवाडी-सुहाग मंगल कार्यालयाशेजारी. हडपसर-भोसलेनगर. नगर रस्ता-हर्मिस हेरिटेज फेज २. शास्त्रीनगर- येरवडा. शनिवारवाड्याजवळ- कसबा पेठ. 
 अधिक माहितीसाठी  ः www.sahyadrihospital.com  ॲप -S3K
 संपर्क - ७७९८३३०१२३ किंवा ७७९८३२०१२३ (स. ९.३० ते सायं. ७)

सकाळ व सह्याद्री हॉस्पिटलच्या सुरक्षा कवच योजनेची मी ११ वर्षे सभासद आहे. माझ्या पतीच्या शेवटच्या आजारात तसेच मी आजारी पडल्यानंतरही या योजनेअंतर्गत आम्हाला उत्तम सेवा व संपूर्ण आर्थिक लाभ मिळाले. वैद्यकीय सेवा, तपासण्या महाग झाल्या असताना या योजनेचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा. 
- आशा शिंदे, वय ७५ वर्षे

Web Title: sakal sahyadri suraksha kavach registration