मनसोक्त शॉपिंगचा आनंद घ्या ! 

मनसोक्त शॉपिंगचा आनंद घ्या ! 

पुणे - हिवाळ्यात शॉपिंगचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे. कारण, "सकाळ माध्यम समूहा'ने "सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल 2018'चे कर्वेनगर येथील पंडित फार्म्समध्ये आयोजन केले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये 10 हजारांहून अधिक प्रॉडक्‍ट आणि 200 हून अधिक स्टॉल्स अशी रेलचेल असणार आहे. 

एकाच छताखाली होम अप्लायन्सेस, कार, फर्निचर, इंटिरियर डेकोरेशनची उत्पादने, किचनमधील वस्तू, कपडे, फॅशन ऍक्‍सेसरीज, ज्वेलरी, फूट वेअर, फूड प्रॉडक्‍ट्‌स, खेळणी आणि गेम्स, गिफ्ट आणि नोव्हेल्टिज्‌, हेल्थ प्रॉडक्‍ट, मसाज इक्विपमेंट, सोलर वॉटर हीटर अशा कितीतरी वस्तूंचे स्टॉल इथे पाहायला मिळणार आहेत. गुरुवार (ता. 6) पासून सोमवार (ता. 10) पर्यंत सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत चालणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये गरजेच्या प्रत्येक वस्तूचा स्टॉल पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे थेट उत्पादक आणि होलसेलर्सकडून खरेदी करता येणार आहे. याशिवाय आकर्षक ऑफर्स, फ्री गिफ्ट, लाइव्ह डेमो आणि मोठ्या डिस्काउंटचाही आनंद लुटता येणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मनसोक्त शॉपिंगचा आनंद घ्यायचा असेल तर वेळ काढून या फेस्टिव्हलला भेट द्यायलाच हवी. 

सकाळ शॉपिंग फेस्टिव्हलविषयी... 
कुठे : पंडित फार्म्स, डी. पी. रस्ता, कर्वेनगर, पुणे 
कधी : 6 ते 10 डिसेंबर 
वेळ : सकाळी 11 ते रात्री 9 
प्रवेश फी - 10 रु. प्रत्येकी 
सुविधा - पार्किंग मोफत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com