‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये ग्राहकांची गर्दी; उद्या शेवटचा दिवस

पंडित फार्म - ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये शनिवारी गृहसजावटीच्या वस्तूंची खरेदी करताना ग्राहक.
पंडित फार्म - ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये शनिवारी गृहसजावटीच्या वस्तूंची खरेदी करताना ग्राहक.

‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये ग्राहकांची गर्दी; उद्या शेवटचा दिवस
पुणे - ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी नागरिकांनी गृहसजावटीच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या खरेदीवर भर दिला.

शहरामध्ये फ्लॅट सिस्टिम अाहे. यामुळे फेस्टिव्हलमध्ये नागरिकांसाठी कमी जागेत आकर्षक सजावटीच्या वस्तू वापरता येतील असे पर्याय माफक दरात उपलब्ध आहेत. आरोग्यासाठी उत्तम आणि चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. हा फेस्टिव्हल सोमवार (ता. १३) पर्यंत सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी खुला आहे.

मी घरासाठी फुलदाण्या, शोपीस घेतले आहेत. बाल्कनीसाठी आर्टिफिशियल लॉन आणि फुलांची खरेदी केली आहे.
- सुनीता पिल्ले, ग्राहक

घराच्या सजावटीत काहीतरी कमी राहते, त्यामुळे नागरिकांसाठी आम्ही छोटे-छोटे कृत्रिम धबधबे ठेवले आहेत. हे धबधबे घरातील कोणत्याही जागेत मावतील याची खास काळजी घेतली आहे.
- नीरज अग्रवाल, स्टॉलधारक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com