मनसोक्त खरेदीचे द्वार खुले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

पुणे - विविध कंपन्यांचे दर्जेदार उत्पादने, पाचशे स्टॉल्स, भरघोस सवलती आणि एक्‍स्चेंज ऑफर्सची संधी देणाऱ्या ‘सकाळ शॉपिंग फेस्टिव्हल’ला शुक्रवारी सुरवात झाली. नावीन्यपूर्ण गृहोपयोगी वस्तूंच्या जोडीला खास महिलांसाठी आकर्षक व डिझाईनचे दागिने, कपडे, पर्स व फूटवेअरचे विविध प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत. शनिवार आणि रविवार सुटीचा दिवस असल्याने पुणेकरांना मनसोक्त खरेदीबरोबर लज्जतदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.

प्रदर्शनाला पहिल्या दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैविध्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण किचन अप्लायन्सेसने महिला-तरुणींचे लक्ष वेधले. किचन शेगडी, फ्रूट ज्युसरसह विविध वस्तू खरेदी करण्याकडे गृहिणींचा कल होता. डिझायनर फर्निचरबरोबर गृहसजावटींच्या वस्तूंनी पुणेकरांना आकर्षित केले. फूड प्रोसेसर्स, किचन चिमणीज्‌, वॉटर प्युरिफायर्स, यूपीएस व इनव्हर्टर्स, वेट ग्राईंडर्स यासह इलेक्‍ट्रिक आयर्न, टोस्टर्स, हॅक्‍युम क्‍लीनर इत्यादी होम अप्लायन्सेसमधील वस्तूंची खरेदी पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात झाली. सोफा सेट्‌स, डायनिंग सेट्‌स, बेडरूम पॅकेजेस, वॉर्डरोब्ज, ड्रेसिंग टेबल, ऑफिस चेअर्स, कार्पेट्‌स यासह गृहसजावटीच्या वस्तूंमध्ये पेंटिंग्ज, म्युरल्स, पडदे, आर्टिफिशल फुले अशा विविध वस्तूही खरेदी करण्यात आल्या. प्रदर्शनात कंझ्युमर प्रॉडक्‍ट्‌सही पाहायला मिळाले. 

या प्रदर्शनातून एकाच छताखाली आरामदायी, मनसोक्त आणि खात्रीशीर खरेदी करण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. होम अप्लायन्सेस, डिझायनर फर्निचर, इंटेरियर डेकोरेशनची उत्पादने, किचन अप्लायन्सेस, कपडे, फॅशन ॲक्‍सेसरीज, ज्वेलरी, फुटवेअर, खेळणी आणि गेम्स, गिफ्ट आणि नॉव्हेल्टीज, हेल्थ प्रॉडक्‍ट आणि फूड प्रॉडक्‍ट्‌स पाहता येतील. नव्या उत्पादनांसह आणि उत्तम दर्जा हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. हा महोत्सव घरातील प्रत्येकाला खरेदीसाठी नावीन्यपूर्ण संधी देत आहे.

कुठे व कधीपर्यंत...
कालावधी - २९ जानेवारीपर्यंत 
वेळ - सकाळी अकरा ते रात्री नऊ
स्थळ - कृषी महाविद्यालयाचे मैदान (सिंचनगरजवळ), रेंजहिल्स
पार्किंग व प्रवेश मोफत.

Web Title: sakal shopping festival