सकाळ अभ्यासमाला उपयुक्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

सकाळ दहावी अभ्यासमाला या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक आणि अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थीच नव्हे; तर त्यांचे पालक आणि शालेय शिक्षक यांचा संभ्रम या अभ्यासमालेमुळे दूर झाला आहे. अभ्यासाचे नियोजन आणि नव्या अभ्यासक्रमामुळे परीक्षेबाबत निर्माण झालेली भीती आता संपली आहे, असे मत पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या मुख्याध्यापकांनी या वेळी व्यक्त केली.

दहावीच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासमालेचा उपयोग होणारच आहे. परंतु माझी मुलगी सध्या आठवीला आहे. तरीही आम्ही या अभ्यासमालेची कात्रणे आताच करून ठेवत आहोत, एवढी ही अभ्यासमाला उपयुक्त ठरणार आहे.
- संतोष शिळीमकर (मुख्याध्यापक,  उज्ज्वला विद्यानिकेतन, पद्मावती)

‘सकाळ’ची अभ्यासमाला ही विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी आकलनात्मक आणि उपयोजनात्मक आहे. यातून विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करणे आणि परीक्षेला सामोरे जाणेदेखील सोपे होणार आहे.
- संध्या गायकवाड (उपशिक्षणाधिकारी)

राज्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावीचा मार्गदर्शक ठरणारा असा हा ‘सकाळ’चा उपक्रम आहे. यामुळे परीक्षेला सामोरे जाताना मुलांना कोणतीही अडचण राहणार नाही, याची खात्री वाटते. स्तुत्य उपक्रम.
- हरिश्‍चंद्र गायकवाड (कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा मुख्याध्यापक महासंघ)

पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जवळ शिक्षणतज्ज्ञ आणण्याचे काम दहावी अभ्यासमालेतून झाले आहे. नवा अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धतीबाबत संभ्रम होते, त्याबद्दल झालेली जागृती सर्वांनाच साह्यभूत ठरेल.
- चंद्रकांत मोहोळ (अध्यक्ष, शहर मुख्याध्यापक संघ)

दहावीचा अभ्यासक्रम बदलला आहे, त्याचा सराव करण्यासाठी ही अभ्यासमाला उत्तम आहे. पालकांनाही ती मार्गदर्शक असून, त्यामुळे विद्यार्थ्यांकडून त्यांना अभ्यास कसा करून घ्यायचा, हे समजेल.
- सुलभा देशमुख (विश्‍वकर्मा स्कूल, बिबवेवाडी)

विद्यार्थ्यांना त्यांच्या शंका निरसन आणि संकल्पना स्पष्ट होण्यासाठी या अभ्यासमालेचा उपयोग होणार आहे. बदललेल्या अभ्यासक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना गुण मिळवून देण्यासाठी अभ्यासमाला फायदेशीर ठरेल.
- पुष्पा देशमुख (साधना कन्या विद्यालय, हडपसर)

Web Title: Sakal SSC Study Course Useful says teacher