सकाळ सुपरस्टार कपमध्ये व्हा सहभागी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

पुणे - बॉलिवूड स्टार्स आणि शहरातील फुटबॉल खेळाडूंमध्ये होणाऱ्या सामन्यात शहरातील गृहनिर्माण संस्थांनाही सहभागी होण्याची संधी आहे. सिनेअभिनेते अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, दिनो मोरिया, शब्बीर अहलुवालिया व करण वाही येत्या शनिवारी (ता. २ जून) होणाऱ्या ‘सकाळ सुपरस्टार कप’ फुटबॉल स्पर्धेत पुण्याच्या संघाविरुद्ध सामना खेळणार आहेत. विविध सामाजिक कामांकरिता निधी उभारण्यासाठी हा सामना होत आहे. 

सामन्यात सहभागी होण्याबरोबरच गृहनिर्माण संस्थांना मैदानाशेजारी स्वतःचा तंबूदेखील उभारता येणार आहे. या सामन्यासंबंधी आणि गृहनिर्माण संस्थांच्या त्यातील सहभागासंबंधी सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल. जीएस स्पोर्टस्‌च्या सहकार्याने ‘सकाळ’ने हा सामना आयोजित केला असून, ‘व्हीटीपी इलेव्हन’ हा पुण्याच्या खेळाडूंचा संघ ‘व्हीटीपी रिॲलिटी’ यांनी प्रायोजित केला आहे. पॉवर्ड बाय फिनोलेक्‍स पाइप्स आणि को-पॉवर्ड बाय क्वेस्ट टुर्स या स्पर्धेसाठी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हे बॅंकिंग पार्टनर, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌स हे एज्युकेशनल पार्टनर, आयआयएफएल वेल्थ मॅनेजमेंट हे वेल्थ पार्टनर आहेत.

मोफत प्रवेशिका 
या सामन्यासाठीच्या मोफत प्रवेशिका रविवारपासून (ता. २७) सकाळी ११ ते ६ या वेळेत ‘सकाळ’च्या बुधवार पेठ व पिंपरी कार्यालयात उपलब्ध असतील. 

‘सकाळ सुपरस्टार कप’ फुटबॉल स्पर्धा 
    फुटबॉल सामना कधी - शनिवार, २ जून 
    कुठे - श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे- बालेवाडी, पुणे 
    वेळ - सायंकाळी ६.३० वाजता 

Web Title: sakal superstar football cup