सभासदत्व नोंदणीसाठी १७ जून अंतिम तारीख

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पुणे - पन्नास वर्षे वयावरील व्यक्तींसाठी असलेल्या ‘सकाळ’ व ‘सह्याद्री हॉस्पिटल’च्या ‘सुरक्षा कवच योजने’च्या नवीन सभासदत्व नोंदणीची अंतिम मुदत रविवारी (ता. १७) संपत आहे. त्यानंतर सभासद नोंदणीला मुदतवाढ मिळणार नाही.

योजनेतील दीड लाख रुपयांची विमा मर्यादा आता दोन लाखांपर्यंत, तर औषधांसाठीची सवलत १५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविली आहे. याशिवाय, विविध वैद्यकीय सेवांवर २० ते ७५ टक्‍क्‍यांपर्यंत सवलत, तज्ज्ञांचा सल्ला, ‘प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप कार्ड’, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कॅथेटर अँजिओग्राफीसाठी विशेष पॅकेज आदी सुविधांचाही लाभ घेता येणार आहे. 

सभासदांना ‘सकाळ’तर्फे आठ दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आस्वाद घेता येईल. योजनेत २००९ पासून एकदाही आंतररुग्ण सेवा न घेणाऱ्या सभासदांसाठी विमा मर्यादा दोन लाख ३० हजार रुपये आहे. सभासदांच्या ५० वर्षे वयाखालील नातेवाइकांना वा परिवारातील व्यक्तींनाही सवलत आहे. नवीन सभासद नोंदणीसाठी निवास व वयाच्या दाखल्याची प्रत देणे आवश्‍यक आहे. 

नोंदणीसाठी हे करा... 
 वय वर्षे ५० ते ६९ साठी : ३,५०० रुपयांचा धनादेश ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे अधिक ८०० रुपयांचा धनादेश ‘सकाळ मीडिया प्रा. लि.’ या नावाने द्यावा. 
 वय वर्षे ७० व अधिक ः ४,६०० रुपयांचा धनादेश ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे अधिक ८०० रुपयांचा धनादेश ‘सकाळ मीडिया प्रा. लि.’ या नावे द्यावा. 
 नोंदणी शुल्क रोखीनेही भरता येईल.

नोंदणीची ठिकाणे -
सह्याद्री हॉस्पिटल, डेक्‍कन जिमखाना- कर्वे रस्ता. कोथरूड-पौड रस्ता, वनाजसमोर. बिबवेवाडी-सुहाग 
मंगल कार्यालयाशेजारी. हडपसर-भोसलेनगर. नगर रस्ता-हर्मिस हेरिटेज फेज २. शास्त्रीनगर- येरवडा. शनिवारवाड्याजवळ- कसबा पेठ.  अधिक माहितीसाठी संपर्क - ७७९८३३०१२३ किंवा ७७९८३२०१२३ (स.९.३० ते सायं. ५.३०)

मी व माझे पती २००८ मध्ये ‘सकाळ’ व ‘सह्याद्री हॉस्पिटल’च्या सुरक्षा कवच योजनेचे सभासद झालो. दुर्दैवाने माझे पती आता हयात नाहीत. त्यांना सह्याद्री रुग्णालयात या योजनेअंतर्गत उत्तम सेवा व संपूर्ण आर्थिक लाभ मिळाला. मलाही डेंगीचे निदान झाल्यावर २०१५ मध्ये सह्याद्रीमध्ये मोफत उपचार झाले.  - आशा शिंदे (वय ७५ वर्षे) 

Web Title: sakal suraksha kavach registration