Sakal Saam Survey: ईडीचा वापर विरोधकांवर दबावासाठी ? मोदींवर होणाऱ्या आरोपाबद्दल जनतेचं मत..

मोदी सरकारवर कुठल्या स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत, त्यावर जनता काय म्हणते पाहा
Sakal Survey
Sakal Survey

पुणे : केंद्रातील भाजप्रणित एनडीए सरकारला अर्थातच मोदी सरकारला नुकतीच ९ वर्षे पूर्ण झाली. या नऊ वर्षांच्या कलावधीत सरकारनं अनेक महत्वाचे निर्णय घेतले. तसेच या काळात देशात अनेक घडामोडी देखील घडल्या. पण विरोधकांनी यावरुन सरकारला वेळोवेळी घेरण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांवर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या. याद्वारे सरकार विरोधकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जात आहे. या मुख्य आरोपांसह इतर आरोपांबाबत महाराष्ट्रातील जनतेला काय वाटतं? याची माहिती सकाळच्या सर्व्हेमधून समोर आली आहे. (Sakal Saam Survey on Narendra Modi Government of Nine years)

Sakal Survey
Maharashtra Politics : ही आमदार थांबवण्याची खेळी, थोड्या दिवसातच सत्य काय ते कळेल; सामंतांच सूचक ट्वीट

विरोधकांनी सरकारवर केलेले आरोप

  1. नोटाबंदीचा निर्णय फसला

  2. देशात धार्मिक तेढ वाढलं

  3. जातीय तणावात वाढ

  4. ठराविक उद्योजकांनाच लाभ देण्याचं धोरण

  5. बेरोजगारीत वाढ

  6. अर्थव्यवस्थेत आल्या अडचणी

  7. केंद्रीय तपाय तंत्रणांचा वापर करुन विरोधकांवर दबाव

  8. संविधानिक मुल्यांची पायमल्ली होतेय

Sakal Survey
MS Dhoni Fan IPL Final : धोनीसाठी चाहते रल्वे स्टेशनवरही झोपले... काहींना मिळाला विराटचा आडोसा

या आरोपांबाबत महाराष्ट्रातील जनतेला काय वाटतं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समुहानं सर्व्हेक्षणाच्या (Sakal Survey) माध्यमातून केला आहे. महाराष्ट्रातील २८८ विधानसभा आणि ४८ लोकसभा मतदारसंघात हा सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेला ४८,७८० लोकांनी प्रतिसाद दिला असून आपली मतं व्यक्त केली आहेत. (Latest Marathi News)

Sakal Survey
Katraj News : तीन महिन्याच्या बाळाच्या पोटातून काढली अंगठी; बाळाचा जीव वाचवण्यात यश

जनतेनं मोदी सरकारवरील आरोपांबाबत भाष्य करताना नोटाबंदी आणि बेरोजगारीबाबत सर्वाधिक नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये अनुक्रमे १५ टक्के आणि १४.२० टक्के लोकांनी सरकारील आरोपांत तथ्य असल्याचं म्हटलंय. त्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन विरोधकांवर दबाव टाकण्यात येत असल्याच्या आरोपांवर ९ टक्के नागरिकांनी तथ्य असल्याचं म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com