बॉलिवूडचा हॉटेस्ट लाइव्ह शो ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पुणे - तरुणांच्या आवडीच्या गायकांची गाणी प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. पुण्यात होणाऱ्या गायक व संगीतकारांच्या ‘लाइव्ह कॉन्सर्ट’ची उत्कंठा शिगेस पोचली आहे. त्यांची गाणी आणि तरुण फॅन्सला एकत्र आणणारा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ हा कार्यक्रम २८ व २९ एप्रिलला पुण्यात होत आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमात बॉलिवूडचे गाजलेले गायक, संगीतकार विशाल व शेखर, फरहान अख्तर, मिका सिंग व बादशाह त्यांची गाजलेली धमाल गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी (ता. २८) फरहान अख्तर, विशाल व शेखर यांचा, तर दुसऱ्या दिवशी (ता.

पुणे - तरुणांच्या आवडीच्या गायकांची गाणी प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. पुण्यात होणाऱ्या गायक व संगीतकारांच्या ‘लाइव्ह कॉन्सर्ट’ची उत्कंठा शिगेस पोचली आहे. त्यांची गाणी आणि तरुण फॅन्सला एकत्र आणणारा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ हा कार्यक्रम २८ व २९ एप्रिलला पुण्यात होत आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणाऱ्या या कार्यक्रमात बॉलिवूडचे गाजलेले गायक, संगीतकार विशाल व शेखर, फरहान अख्तर, मिका सिंग व बादशाह त्यांची गाजलेली धमाल गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी (ता. २८) फरहान अख्तर, विशाल व शेखर यांचा, तर दुसऱ्या दिवशी (ता. २९) मिका सिंग व बादशाह यांचा सहभाग असणार आहे. 

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक लिनन किंग, सहप्रायोजक सुझुकी इन्ट्य्रूडर, तर फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., सहप्रायोजक टोयोटा, पेशवाई क्रिएशन व श्रीमंत कलेक्‍शन, ट्रॅव्हल पार्टनर गिरिकंद ट्रॅव्हल तर स्नॅक्‍स पार्टनर हल्दिराम आहेत. 

समरसॉल्ट हा मुख्यतः तरुणाईचा कार्यक्रम आहे. ‘सकाळ’चा वाचकवर्ग मोठा आहे. त्यामुळे कार्यक्रमाला प्रतिसाद भरघोस मिळेल. असे कार्यक्रम पुण्यात वारंवार व्हायला पाहिजे; जेणेकरून पुण्यातील जास्तीत जास्त तरुणाई आमच्या बरोबर जोडली जाईल. पेशवाई क्रिएशन व श्रीमंत कलेक्‍शन हे तरुणाईच्या पसंतीचे दालन आहे. 
- अमोल येमुल, पेशवाई क्रिएशन 

‘सकाळ’बरोबर आम्ही बरीच वर्षे आहोत. दरवेळेस ‘सकाळ’च्या इव्हेंटमध्ये आम्ही सहभागी होतो. ‘सकाळ’ ज्या प्रकारे काम करतो, ते समाजातील प्रत्येक घटक त्यांच्यासोबत जोडला जातो. समरसॉल्ट हा मोठा कार्यक्रम आहे. त्यामुळे निश्‍चितच जास्त लोकांपर्यंत आम्हाला ही 
पोचता येईल. 
- राहुल मुरकुटे, संचालक, भैरवी प्युअर व्हेज

प्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध 
कोठे - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड), बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर (टिळक रस्ता), रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड) (सकाळी ९ ते ११.३०, सायंकाळी ५ ते रात्री ८)
‘सकाळ’ बुधवार पेठ कार्यालय, शनिवारवाड्याजवळ  (सकाळी ११ ते संध्याकाळी ६)
गिरिकंद ट्रॅव्हल्स, भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना (सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत) 
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रा. लि., मार्को प्लाझा, हिंजवडी शाखा व वर्ल्ड ट्रेड सेंटर, खराडी शाखा (सकाळी ११ ते सायंकाळी ५).

सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018
    शनिवार - २८ एप्रिल 
    सहभाग - फरहान अख्तर, विशाल व शेखर 
    रविवार - २९ एप्रिल 
    सहभाग - मिका सिंग, बादशाह 
    कुठे - शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे 
    केव्हा - संध्याकाळी ६ वाजल्यापासून. 
    ऑनलाइन बुकिंगसाठी - BOOK MY SHOW 
    अधिक माहितीसाठी संपर्क - ९०११०८५२५५

Web Title: sakal times ssummersault 2018 event bollywood