तरुणाईसाठी ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पुणे - उसळती तरुणाई आणि त्यांना आवडणारे संगीत यांना एकत्र आणणारा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट’ हा संगीत कार्यक्रम पुण्यामध्ये होत आहे. वेगवेगळ्या संगीताचा आस्वाद घेण्याची पुणेकरांची खासियत आहे. त्यात तरुण आणि त्यांना आवडणारे संगीत म्हणजे धमाल मस्ती. मनोरंजनाच्या या कार्यक्रमाचे आयोजन २८ व २९ एप्रिल रोजी म्हाळुंगे येथील शिवछत्रपती स्टेडियममध्ये केले आहे. यात बॉलिवूड गायकांच्या गाण्यांचा आनंद पुणेकरांना मिळणार आहे.  

तरुणांच्या तुफान आवडीचे गायक आणि त्यांची गाणी प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पुणेकर तरुणांना मिळत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात बॉलिवूडचे आघाडीचे 

गायक मिका सिंग, विशाल, शेखर, बादशाह आणि फरहान अख्तर हे येणार आहेत. लिनन किंग हे या कार्यक्रमाचे मुख्य 

प्रायोजक आहेत. रसिकांसाठी कार्यक्रमाची तिकिटे मंगळवारपासून BOOK 
MY SHOW आणि INSIDER.IN येथे उपलब्ध असणार आहेत.  

सोशल मीडिया -
फेसबुक - https://www.facebook.com/Sakal-Times-Summersault

ट्‌विटर - https://twitter.com/summersaultpune

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/sakaltimessummersault

यू ट्यूब - https://www.youtube.com/channel/UCbULaAZvueWGQ३m७lXfOxng

सकाळ टाइम्स समरसॉल्ट
कधी - शनिवार : २८ एप्रिल
कोण - फरहान अख्तर, विशाल व शेखर

कधी - रविवार - २९ एप्रिल
कोण - मिका सिंग, बादशाह
कुठे : शिवछत्रपती क्रीडासंकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे
केव्हा : संध्याकाळी ६.३० पासून.  
ऑनलाइन बुकिंगसाठी : BOOK MY SHOW व INSIDER.IN
संपर्क - ९०११०८५२५५      
वेबसाइट : www.summersault.in

Web Title: sakal times summersault 2018 entertainment