लेट्स रॉक पुणेकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पुणे - समरसॉल्ट २०१८ हा कार्यक्रम येत्या शनिवार (ता. २८) रविवारी (ता.२९) पुण्यात होत आहे. या कार्यक्रमात मौजा ही मौजा फेम गायक मिका सिंग परफॉर्म करणार आहे. त्या निमित्ताने त्याच्याशी आलिशा शिंदे यांनी केलेली बातचीत.
गेल्या काही वर्षात बॉलिवूड संगीत कसे बदलत आले आहे? पाश्‍चिमात्य संगीताशी ते कितपत जवळीक साधते?
गेल्या दशकात बॉलिवूड संगीत नक्कीच बदलले आहे. पाश्‍चिमात्यांसारखेच आपण सुद्धा चांगले संगीत देत आहोत. आमचे कुशल संगीतकार आणि गायक प्रेक्षकांवर जणू जादूच करतात.
 
असे बऱ्याचदा म्हटले जाते की बॉलिवूड संगीत पाश्‍चिमात्य संगीताच्या प्रभावाखाली आहे. तुझे याबाबत काय मत आहे?
आपण हे नाकारू नाही शकत, हा थोडा प्रभाव असण्याचा भाग आहे. परंतु आपल्या संगीतात कायम प्रादेशिकता आणि संस्कृती जोडलेली आहे, यावर माझा ठाम विश्‍वास आहे.

बऱ्याच पंजाबी कलाकारांनी आणि त्यांच्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर जणू राज्य केले आहे. नजीकच्या भविष्यात अशा कुठल्या कलाकाराबरोबर कोलॅबरेशन करण्याचा तुझा विचार आहे? 
सगळ्या कलाकारांबरोबर काम करण्यासाठी उत्सुक आहे. ते प्रतिभावान आहेत व फार चांगले काम करत आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. 

पंजाबी संगीताबद्दल काय सांगशील?
पंजाबी संगीत, पंजाबी गाणी यात खूप ऊर्जा आहे. आम्ही कोणत्याही ठिकाणाला पार्टीचा मूड देऊ शकतो आणि गाणे डान्समध्ये बदलू शकतो. 

अनेक वर्षांपासून पंजाबी संगीत हा बॉलिवूडचा अविभाज्य असा भाग आहे आणि भविष्यातही तो असाच राहील, अशी माझी अपेक्षा आहे. 

सतत होणारे ट्रोलिंग आणि सेलिब्रिटिज त्याबाबत भूमिका घेत नाही अशी टीका होत आहे. कलाकारांना असे लक्ष्य केले जात आहे असे तुला वाटते का?
कलाकार लक्ष्य ठरत आहे याबाबत मला खात्री आहे. आपण ज्या गोष्टीवर ठाम असतो त्यावर भूमिका घ्यायला हवी, मत द्यायला हवे. कधी भूमिका न घेणे हेही महत्त्वाचे ठरते. आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो, जिथे आपले मत व्यक्त करण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. 

पुणेकरांसाठी काय गाणी सादर करणार आहेस?
पुणेकरांसाठी माझी जुनी तसेच नवीन गाणी सादर करणार आहे. त्याशिवाय माझी येणारी नवीन गाणीही सादर करणार आहे. 

पुणेकरांना काय संदेश देशील?
पुणेकरांनो, माझ्यासोबत रॉक करायला तयार राहा. पुणे शहर मला आवडते आणि परफॉर्मन्स द्यायला आता मी खूप उत्सुक आहे.

Web Title: sakal times summersault event song mika singh