देश-विदेशांतील पर्यटनस्थळे एका छताखाली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

पुणे - अंदमान निकोबार असो वा हिमाचल प्रदेश... ऑस्ट्रेलिया असो वा न्यूझीलंड... देश-विदेशांतील भ्रमंतीतील अनेक पर्यायांची माहिती आणि पर्यटकांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देणाऱ्या "सकाळ टुरिझम एक्‍स्पो'ला शुक्रवारी पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. नामांकित पर्यटन संस्थांनी भटकंतीची वेगवेगळी ठिकाणे अन्‌ त्यांनी सादर केलेल्या वैविध्यपूर्ण पॅकेजेस्‌ला त्यांची पसंती मिळाली. काहींनी टूर पॅकेजेस्‌चे थेट बुकिंगही केले. या प्रदर्शनात पर्यटकांना पावसाळी आणि हिवाळी पर्यटनासाठीचे अनेक पर्याय पाहता येणार आहेत. 

पुणे - अंदमान निकोबार असो वा हिमाचल प्रदेश... ऑस्ट्रेलिया असो वा न्यूझीलंड... देश-विदेशांतील भ्रमंतीतील अनेक पर्यायांची माहिती आणि पर्यटकांच्या मनातील प्रश्नांना उत्तर देणाऱ्या "सकाळ टुरिझम एक्‍स्पो'ला शुक्रवारी पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. नामांकित पर्यटन संस्थांनी भटकंतीची वेगवेगळी ठिकाणे अन्‌ त्यांनी सादर केलेल्या वैविध्यपूर्ण पॅकेजेस्‌ला त्यांची पसंती मिळाली. काहींनी टूर पॅकेजेस्‌चे थेट बुकिंगही केले. या प्रदर्शनात पर्यटकांना पावसाळी आणि हिवाळी पर्यटनासाठीचे अनेक पर्याय पाहता येणार आहेत. 

"मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. "सकाळ पुणे'चे बिझनेस हेड राकेश मल्होत्रा यांच्यासह पर्यटन संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ठाकरे यांनी प्रदर्शनास शुभेच्छा देऊन, जास्तीत जास्त पर्यटकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. पाच हजार ते पाच लाखापर्यंत बजेट असलेल्या टूर्सबद्दल पर्यटकांना येथे माहिती मिळाली. यात 300 हून अधिक टूर्स पॅकेजेसचे पर्याय असून, 30 हून अधिक पर्यटन संस्थांनी यात सहभाग घेतला आहे. "मास्टर टूर्स ऑर्गनायझर प्रा. लि.' हे प्रदर्शनाचे प्रायोजक असून, कॅप्टन नीलेश गायकवाड व गिरिकंद ट्रॅव्हल्स हे सहप्रायोजक आहेत. पर्यटकांसाठी गोव्यातील हेरिटेज व्हिलेज क्‍लब या बिच रिसॉर्टतर्फे दोन दिवसांच्या नाइट स्टेसोबत तिसऱ्या दिवसाचे नाइट स्टे मोफत असणार आहे. 

""देशांतर्गत पर्यटनासह परदेशांतील पर्यटनाचे अनोखे पर्याय आम्ही उपलब्ध केले आहेत. पॅकेजेसवर खास सवलतीही दिल्या असून, दुबई, सिंगापूर, मलेशिया, थायलंड आणि युरोप येथील पॅकेजेस पर्यटकांना पाहता येतील.'' 
- यशिका शहा, संचालिका, "मास्टर टूर्स ऑर्गनायझर प्रा. लि.' 

""देश-विदेशांतील पर्यटनाचे पर्याय हे आमचे खास वैशिष्ट्य आहे. प्रदर्शनात उत्कृष्ट पर्यांयांच्या बुकिंगवर "स्पिन टू व्हील' या उपक्रमांतर्गत तीन हजार रुपयांची सवलत दिली जाणार असून, परदेशांतील टूर पॅकेज नक्कीच पर्यटकांना आवडतील.'' 
- अखिलेश जोशी, संचालक, गिरिकंद ट्रॅव्हल्स 

""गेल्या दहा वर्षांपासून आम्ही पर्यटकांना अंदमानाची सफर घडवत आहोत. लवकरच आम्ही एक लाख पर्यटकांचा पल्ला गाठणार आहोत. पुढेही ही वाटचाल सुरूच राहील. याबरोबर पौराणिक पर्यटनाचे महत्त्व रुजावे, यासाठी "बाली' येथील पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहे.'' 
- कॅप्टन नीलेश गायकवाड, संचालक, कॅप्टन नीलेश गायकवाड 

""आमच्याकडे देश-विदेशांतील पर्यटनाचे पर्याय उपलब्ध असून, याचे थेट बुकिंग पर्यटकांना प्रदर्शनात करता येणार आहेत. त्याच बजेटमधील पर्यायांच्या पॅकेजेसमध्ये आम्ही उत्तम सोयीसुविधा देत आहोत. त्यामुळे प्रदर्शनात पर्यायांची माहिती देण्यासह खास सवलतींचाही फायदा पर्यटकांना घेता येईल.'' 
- झेलम चौबळ, संचालिका, केसरी टूर्स 

""सकाळच्या या प्रदर्शनात पर्यटकांना भ्रमंतीसाठीचे योग्य पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, नामांकित पर्यटन संस्थांनी यात सहभाग घेतल्याने आवडत्या डेस्टिनेशनसह बजेट आणि सुविधांचाही लाभ पर्यटकांना घेता येणार आहे. '' 
- डॉ. विश्‍वास केळकर, अध्यक्ष, ट्रॅव्हल एजंट्‌स असोसिएशन ऑफ पुणे 

पर्यटन कट्टा 
प्रदर्शनाचे खास आकर्षण असलेल्या आणि पर्यटकांचे अनुभव मांडणाऱ्या पर्यटन कट्ट्यालाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी टुरिझम कट्ट्यावर आनंद राजेशिर्के यांचे नर्मदा परिक्रमा या विषयावर तर मधुकर पोतदार यांचे "तमिळनाडू पंचतत्त्व मंदिरे आणि दुबई' या विषयावर व्याख्यान झाले. जयवंत दातार यांनी कधीही न पाहिलेल्या न्यूझीलंडचे विविध पैलू "अनसीन न्यूझीलंड' यातून मांडले. 

शनिवारी (ता. 28) पर्यटन कट्टा - पर्यटकांचा पर्यटकांसाठी संवाद 
- दु. 11.30 वा. - डॉ. स्मिता केळकर - विषय - स्टडी टूर जर्मनी 
- दु. 12.30 वा. - समीर आचार्य - विषय - सिंगापूर 
- दु. 1.30 वा. - दत्तप्रसाद साठे - विषय - युरोप 

काय - सकाळ टुरिझम एक्‍स्पो 2018 
कालावधी - रविवारपर्यंत (ता. 29) 
स्थळ - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट 
वेळ - सकाळी अकरा ते रात्री नऊ 
सुविधा - पार्किंग व प्रवेश विनामूल्य

Web Title: Sakal Tourism Expo