‘टुरिझम एक्‍स्पो’ आजपासून

Sakal-Tourism-Expo
Sakal-Tourism-Expo

पुणे - राजस्थान असो अथवा युरोप, दार्जिलिंग असो, आफ्रिका...या सारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांच्या विविध पर्यायांची माहिती एकाच छताखाली देणारे ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो : २०१९’ हे प्रदर्शन शुक्रवार (ता. १) ते रविवार (ता. ३) दरम्यान आयोजित केले आहे. यामध्ये विविध टूर्स पॅकेजसह स्टेट टुरिझमचे अनेक पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या सहभागी होणार आहेत. तीसहून अधिक कंपन्यांच्या स्टॉलमधून फिरण्याच्या विविध पर्यायांची माहिती यातून पर्यटनप्रेमींना मिळणार आहे.

या प्रदर्शनात स्थलदर्शन, मनोरंजन, तीर्थस्थळ या पर्यटन स्थळांबरोबर नयनरम्य डेस्टिनेशन, इव्हेंट लोकेशन व सामाजिक पर्यटनाची माहिती मिळू शकेल. चीन, कंबोडिया, युरोप, थायलंड, बाली यासह हजारो पर्यटन स्थळांची माहिती यात मिळणार आहे. क्रुझेसविषयीही माहिती जाणून घेता येईल. ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो : २०१९ ’चे मास्टर टूर ऑर्गनायझर्स हे टायटल स्पॉन्सर असून, पॉवर्ड बाय गिरिकंद ट्रॅव्हल्स प्रा. लि. हे आहेत. कॅप्टन नीलेश गायकवाड, सनीज वर्ल्ड व क्वेस्ट टूर्स हे सहप्रायोजक आहेत, तर स्टेट टुरिझम पार्टनर जम्मू-काश्‍मीर टुरिझम आहेत. 

फक्त प्रदर्शनामध्ये 
  ॲड लॅब इमॅजिकातर्फे इमॅजिकाची तिकिटे खरेदी केल्यास तिकिटावर ‘बाय वन, गेट वन’ ऑफर मिळणार आहे. 
  गेट सेट गो हॉलिडेजतर्फे कोणतेही इंटरनॅशनल पॅकेज बुक करा आणि 2N3D  (दोन रात्री व तीन दिवसांचे) दुबई पॅकेज फ्री मिळवा. 

सहभागी होणाऱ्या कंपन्या
मास्टर टूर ऑर्गनायझर, गिरिकंद ट्रॅव्हल्स, सनीज वर्ल्ड, कॅ. नीलेश गायकवाड, क्वेस्ट टूर्स, जम्मू ॲण्ड काश्‍मीर टुरिझम, आर्क ट्रॅव्हल्स (जेन्टिंग क्रुझ), विहार ट्रॅव्हल्स, केसरी टूर्स, एसटीए हॉलिडेज, ॲडलॅब इमॅजिका, कॉक्‍स ॲण्ड किंग, गुरुनाथ ट्रॅव्हल्स, एक्‍सकर्शिया टूर्स, थॉमस कुक,  एसओटीसी ट्रॅव्हल, मेक माय ट्रीप, बी जी टूर्स, गेट सेट गो हॉलिडेज, सन टुरिझम, तुकाई टुरिझम, फिरू या डॉट कॉम, वैष्णवी टूर्स, एक्‍स्प्लोरर्स हॉलिडेज, चौधरी यात्रा कंपनी, नीम हॉलिडेज, पवन टूर्स,  हॅपी जर्नीज, मातृभूमी टूर्स, मंत्रा रिसॉर्ट, सिनर्जी हॉलिडे व्हिलेज, हर्षा हॉलिडेज

एक्‍स्पोविषयी अधिक माहिती...
  कुठे - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे 
  केव्हा - १ फेब्रुवारी ते ३ फेब्रुवारी २०१९
  कधी - सकाळी ११ ते रात्री ९ 
  प्रवेश व पार्किंग फ्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com