सकाळ टुरिझम एक्स्पो 2019; येत्या शुक्रवारी होणार पुण्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

पाच हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत बजेट असलेल्या टूर्सची माहिती घेण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होईल. अमेरिका, जपान, युरोप, थायलंड, सिंगापूरसह जम्मू-काश्मीर व महाराष्ट्रातील भटकंतीच्या विविध पर्यायांची माहिती पर्यटनप्रेमींना एकाच
छताखाली घेता येणार आहे.

 पुणे : ऑस्ट्रेलिया ते युरोप, काश्मीर ते कन्याकुमारी अशा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जगभरातील भ्रमंतीच्या पर्यायांची माहिती देणारे सकाळ टुरिझम एक्स्पो : २०१९' हे प्रदर्शन शुक्रवार (ता. 9) ते रविवार (ता. 11) दरम्यान आयोजित केले आहे. यामध्ये विविध टूर्स व अनेक पर्याय देणाऱ् या कंपन्या सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनात तीसहून अधिक यात्रा  कंपन्यांच्या स्टॉलच्या माध्यमातून तीनशेहून अधिक फिरण्याच्या पर्यायांची माहिती मिळणार आहेत. 

पाच हजारांपासून ते पाच लाखांपर्यंत बजेट असलेल्या टूर्सची माहिती घेण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होईल. अमेरिका, जपान, युरोप, थायलंड, सिंगापूरसह जम्मू-काश्मीर व महाराष्ट्रातील भटकंतीच्या विविध पर्यायांची माहिती पर्यटनप्रेमींना एकाच
छताखाली घेता येणार आहे.

सकाळ टुरिझम एक्स्पो २०१९
कुठे : गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे
केव्हा : 9 ते 11 ऑगस्ट 
कधी : सकाळी ११ ते रात्री ९
संपर्क : सुनिल शेवाळे 7057375095
          प्रविण घोगरे 7387710404 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Tourism Expo 2019 will be held on Friday in Pune