सकाळ टुरिझम एक्‍स्पो आजपासून तीन दिवस 

सकाळ टुरिझम एक्‍स्पो आजपासून तीन दिवस 

पुणे - भ्रमंतीतील अनेक पर्यायांची माहिती व पर्यटकांच्या मनातील प्रश्‍नांची उत्तरे देणारे ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो’ हे प्रदर्शन शुक्रवार (ता. २७) पासून सुरू होत आहे. देश-विदेशातील ३०० हून अधिक टूर्स पॅकेजेसचे पर्याय देणाऱ्या ३०हून अधिक पर्यटन संस्थांचा यात सहभाग आहे. पाच हजार ते पाच लाखांपर्यंत बजेट असलेल्या टूर्सबद्दल एकाच ठिकाणी माहिती घेण्याची ही उत्तम संधी आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात पर्यटकांचे अनुभव मांडणारा ‘पर्यटन कट्टा’ हे मुख्य आकर्षण असेल. नर्मदा परिक्रमा, तमिळनाडू पंचतत्त्व, कैलास मानसरोवर, कोलकाता, भूतान, इस्राईल, युरोप, न्यूझीलंड, रशिया टूर, जर्मनी स्टडी टूर यांसारख्या अनेक विषयांवर पर्यटक त्यांचे अनुभव, तेथील ठिकाणे यासंबंधी संवाद साधणार आहेत. ‘मास्टर टुर्स ऑर्गनायझर प्रा. लि.’ हे प्रदर्शनाचे प्रायोजक असून, ‘कॅप्टन नीलेश गायकवाड’ व ‘गिरिकंद ट्रॅव्हल्स’ सहप्रायोजक आहेत. 

 शुक्रवार (ता. २७)  टुरिझम कट्ट्यावर : 
पर्यटकांचा पर्यटकांसाठी संवाद 
 दु.२ वा. - आनंद राजेशिर्के - विषय- नर्मदा परिक्रमा
 दु.३ वा. - मधुकर पोतदार - विषय- तमिळनाडू पंचतत्त्व मंदिरे आणि दुबई
 दु.४ वा. - जयवंत दातार - विषय- अनसीन न्यूझीलंड
 कुठे - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट 

 काय : सकाळ टुरिझम एक्‍स्पो २०१८ 
 कुठे - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट 
 केव्हा - शुक्रवार (ता. ७) ते रविवार (ता. २९) 
 कधी - सकाळी ११ ते रात्री ९ 
 संपर्क - ९८५०९९२२८९ 
 सुविधा - पार्किंग व प्रवेश विनामूल्य.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com