पर्यटनस्थळांच्या अनेकविध पर्यायांना पसंती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जुलै 2018

पुणे - लेह-लडाखची चित्तथरारक ट्रीप अनुभवण्याचे तन्वीचे प्लॅनिंग असो वा हिमाचल प्रदेशचे निसर्गसौंदर्य सहकुटुंब टिपण्यासाठी सुधाकर काकडे यांनी केलेले बुकिंग...अशा कित्येकांना वेगवेगळ्या ठिकाणच्या भ्रमंतीचे पर्याय आणि बुकिंग थेट शनिवारी ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो’मध्ये पर्यटकांना करता आले. 

पुणे - लेह-लडाखची चित्तथरारक ट्रीप अनुभवण्याचे तन्वीचे प्लॅनिंग असो वा हिमाचल प्रदेशचे निसर्गसौंदर्य सहकुटुंब टिपण्यासाठी सुधाकर काकडे यांनी केलेले बुकिंग...अशा कित्येकांना वेगवेगळ्या ठिकाणच्या भ्रमंतीचे पर्याय आणि बुकिंग थेट शनिवारी ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो’मध्ये पर्यटकांना करता आले. 

या प्रदर्शनात देश-विदेशातील पर्यायांना पर्यटकांची पसंती मिळाली. तर काहींनी थेट बुकिंग करत हिवाळ्यात आणि पावसाळ्यात फिरायला जाण्याचे निश्‍चित केले. रविवारी (ता. २९) प्रदर्शनाचा समारोप होणार असून, टूर पॅकेजेसची माहिती घेण्याची शेवटची संधी असेल. प्रदर्शनाला शनिवारी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुटीचे निमित्त साधत देशविदेशांतील टूर पॅकेजेसची माहिती घेण्यासाठी पर्यटकांनी सहकुटुंब गर्दी केली होती. काहींनी ‘ऑन स्पॉट बुकिंग’वर सवलतीचा लाभ घेतला. या प्रदर्शनात ३० हून अधिक नामांकित पर्यटन संस्थांची ३०० हून अधिक टूर पॅकेजेसची माहिती घेता येणार आहे.

आव्हानात्मक जागी फिरण्याची आवड असलेल्यांसाठी आणि एखाद्या रम्य ठिकाणी सहकुटुंबासह वेळ घालविण्याचे निमित्त शोधणाऱ्यांसाठी... जंगलातील भटकंतीचा थ्रिल वा ऐतिहासिक-धार्मिक ठिकाणे... असे बहुविध पर्याय प्रदर्शनात पर्यटकांना पाहता येतील. पाच हजार ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या बजेटमधील पर्याय पर्यटकांना पाहायला मिळतील. ‘मास्टर टूर्स ऑर्गनायझर प्रा. लि.’ हे प्रदर्शनाचे प्रायोजक असून, कॅप्टन नीलेश गायकवाड आणि गिरिकंद ट्रॅव्हल्स हे सहप्रायोजक आहेत.

थायलंड आणि स्वित्झर्लंडसह परदेशांतील अनेक ठिकाणी भ्रमंतीसाठीचे टूर पॅकेजेस आमच्याकडे उपलब्ध आहेत. ‘अजहरबैजान’ या देशातील पर्यटनासाठीचा नवा पर्यायही उपलब्ध असून, समुद्र आणि बर्फ असे वेगळे कॉम्बिनेशन या ठिकाणी पर्यटकांना अनुभवता येईल.
- शशांक कुलकर्णी, संचालक, टेक केअर व्हॉयेजेस

आम्ही गेली ३० वर्षे पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहोत. देश-विदेशांतील अनेक पर्याय आमच्याकडे उपलब्ध असून, ‘सकाळ’ने पर्यटन संस्थांना त्यांचे काम पर्यटकांसमोर मांडण्याची प्रदर्शनाच्या माध्यमातून योग्य संधी दिली आहे. आम्ही भूतान देशातील पर्यटनाला चालना देत आहोत.
- मनीष केळकर, संचालक, बी. जी. टूर्स

रविवारी (ता. २९) पर्यटन कट्टा - पर्यटकांचा पर्यटकांसाठी संवाद
 दु. १२ वा. - प्रशांत जोशी - विषय - नॉर्थ ईस्ट
 दु. १ वा. - मयूरेश कुलकर्णी - विषय - रशिया स्टडी टूर
 दु. २ वा. - जग्गनाथ माने, हेमंत कांबळे आणि अनिल जावळे - विषय - कैलास मानसरोवर
 दु. ३ वा. - याशी लेनधूप - भूतान
 दु. ४ वा. - सुधीर बापट - कोलकाता

 काय - सकाळ टुरिझम एक्‍स्पो २०१८
 कालावधी - रविवारपर्यंत (ता. २९)
 स्थळ - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट
 वेळ - सकाळी अकरा ते रात्री नऊ
 सुविधा - प्रवेश व पार्किंग मोफत

पर्यटन कट्टा
प्रदर्शनाचे खास आकर्षण असलेल्या व पर्यटकांचे अनुभव उलगडणाऱ्या ‘पर्यटन कट्ट्याला’ पर्यटकांचा प्रतिसाद मिळाला. शनिवारी या कट्ट्यावर डॉ. सविता केळकर यांचे ‘स्टडी टूर जर्मनी’, समीर आचार्य यांचे ‘सिंगापूर’ आणि दत्तप्रसाद साठे यांचे ‘युरोप’ या विषयावर व्याख्यान झाले. 

Web Title: sakal tourism expo tourist