अक्षय तृतीयेला घ्या मनासारखे घर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पो 
कधी : 14 व 15 एप्रिल 
कुठे : महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे 
वेळ : सकाळी 11 ते रात्री 8 
प्रवेश व पार्किंग विनामूल्य 

पुणे - प्रत्येकाला स्वत-च्या हक्काच्या घरात राहायचे असते; पण मनासारखे घर कुठे घ्यावे, या प्रश्‍नाचे उत्तर देणारा "सकाळ वास्तू एक्‍स्पो 2018' शनिवारपासून सुरू होत आहे. शनिवारी (ता. 14) आणि रविवारी (ता. 15) कर्वेनगरमधील महालक्ष्मी लॉन्स येथे "सकाळ माध्यम समूहा'ने या भव्य एक्‍स्पोचे आयोजन केले आहे. 

"सकाळ वास्तू एक्‍स्पो 2018'मध्ये 30 हून अधिक बांधकाम व्यावसायिक त्यांचे 150 हून अधिक प्रकल्प सादर करीत आहेत. पुण्याभोवतीचे प्रकल्प, त्यांचे बजेट, विविध प्रकल्पांमधील सुविधा, पैसे गुंतविण्यासाठी फायदेशीर ठिकाणे, त्या परिसराच्या विकासाची दिशा अशा मुद्‌द्‌यांसोबतच रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय एक्‍स्पोमध्ये पाहता येणार आहेत. साधारणत- 9 लाख रुपयांपासून 2 कोटी रुपयांपर्यंतची घरे बघावयास मिळणार आहेत. शिवाय, रिअल इस्टेटशी निगडित होमलोनपासून फायनान्सपर्यंतच्या अन्य सर्व शंकांनाही उत्तरे मिळणार आहेत. गृहखरेदीदारांचे बजेट, इच्छा, आवड, सोय अशा प्रत्येक प्रश्‍नाचे योग्य उत्तर या एक्‍स्पोमधून मिळू शकेल. 

सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पो 
कधी : 14 व 15 एप्रिल 
कुठे : महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे 
वेळ : सकाळी 11 ते रात्री 8 
प्रवेश व पार्किंग विनामूल्य 

Web Title: Sakal Vaastu Expo 2018