स्वप्नातील घर वास्तवात उतरण्यास मदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

पिंपरी - मला फ्लॅट हवाय, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्कासमवेत इतर सरकारी खर्चासह त्याची किंमत काय, तुमच्याकडे कोणत्या ‘ॲमिनिटीज्‌’ आहेत, यांसारख्या प्रश्‍नांमधून अनेक कुटुंबांनी ‘सकाळ वास्तू’ प्रदर्शनामध्ये ‘स्वप्नातील घर’ वास्तवात उतरविण्याच्या दिशेने पाऊल उचलले. या दोनदिवसीय प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पिंपरी - मला फ्लॅट हवाय, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्कासमवेत इतर सरकारी खर्चासह त्याची किंमत काय, तुमच्याकडे कोणत्या ‘ॲमिनिटीज्‌’ आहेत, यांसारख्या प्रश्‍नांमधून अनेक कुटुंबांनी ‘सकाळ वास्तू’ प्रदर्शनामध्ये ‘स्वप्नातील घर’ वास्तवात उतरविण्याच्या दिशेने पाऊल उचलले. या दोनदिवसीय प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

‘ऐश्‍वर्यम हमारा’ प्रस्तुत आणि ‘सकाळ’ माध्यम समूहाने ऑटो क्‍लस्टर येथे आयोजित केलेल्या ‘सकाळ वास्तू’ गृहप्रकल्पविषयक प्रदर्शनाचा रविवारी उत्साहात समारोप झाला. अंतिम दिवशीदेखील अनेक नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली. कोणी स्वतःच्या नवीन घराच्या शोधात होते; तर कोणी फ्लॅट किंवा मोकळ्या जागेत गुंतवणूक करण्यासाठी स्टॉल्सवर विचारपूस करताना दिसत होते. स्टॉलधारक आणि त्यांच्या प्रतिनिधींनी इच्छुक व्यक्तींना आवश्‍यक माहिती पुरविली.

पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली-मोशी, रावेत, प्राधिकरण, पुनावळे यासारख्या भागांमध्ये फ्लॅट घेण्याकडे सर्वसाधारणपणे नागरिकांचा कल दिसून येत होता. एकाच छताखाली गृहप्रकल्पांचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. काही बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांसाठी ‘साइट व्हिजिट’चीदेखील सोय केली होती. त्याचाही नागरिकांनी लाभ घेतला.

बांधकाम व्यावसायिक प्रतिक्रिया
मोहन आगरवाल, बंटी ग्रुप ः
या वर्षी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आकुर्डी, दापोडी येथील गृहप्रकल्पांबाबत लोक चौकशी करत होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या बांधकाम क्षेत्रातील धोरणांचा दीर्घकाळाच्या दृष्टीने चांगले परिणाम दिसतील. ‘रेरा’ कायद्याचा ग्राहकांना फायदा होईल. 

राहुल सांकला, रोशन रिॲलिटीज ः खास प्रदर्शनानिमित्त ग्राहकांना सवलती दिल्या गेल्या. कमीत कमी किमतीत ग्राहकांना फ्लॅट उपलब्ध आहेत. चाकण येथे ग्राहकांना परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. वेळेवर ताबा आणि उत्कृष्ट दर्जा हे आमचे वैशिष्ट्य आहे.

मुकेश तिलवानी, श्‍यामा बिल्डर्स ः ग्राहकांसाठी ‘साइट व्हिजिट’ची सोय उपलब्ध करून दिली. चिखली, मोशी, रावेत येथील भागांतील घरांकरिता ग्राहक चौकशी करत होते. आलिशान फ्लॅटस्‌ऐवजी लोकांचा १/२ बीएचकेला पसंती राहिली.

पंकज येवला, भूमी इन्फ्रोकॉम ः हे प्रदर्शन बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक या दोघांची भेट घडवून आणण्यासाठी फायदेशीर ठरले. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मध्यमवर्गातील ग्राहकांकडून १/२ बीएचकेसाठी विचारपूस झाली.

ग्राहकांच्या प्रतिक्रिया
प्रतिभा भाईगडे, गृहिणी ः
रावेत, प्राधिकरण, निगडी भागांमध्ये आम्ही घर पाहत आहोत. प्रदर्शनामुळे २ बीएचके घरासाठी आम्हाला जास्त पर्याय पडताळून पाहता आले. हीच जमेची बाजू ठरली. आता आम्ही ‘साइट व्हिजिट’ करणार 
आहोत.

श्‍वेता कुलकर्णी, प्राधिकरण ः प्रदर्शन पाहण्यासाठी प्रथमच आलो. प्रदर्शन खूप चांगले वाटले. रावेत, प्राधिकरण येथे २ बीएचके फ्लॅट घ्यायचा आहे. त्यासाठी आम्हाला परवडणारे पर्याय पाहण्यात आले. एकाच छताखाली बांधकाम व्यावसायिक एकत्र आल्याने खूप वेळ वाचला.

प्रतीक निंबाळकर, नोकरदार ः तयार फ्लॅटस्‌चीही माहिती मिळाली. त्यांच्या किमतीही जाणून घेता आल्या. मला हिंजवडी येथील ऑफिसजवळच फ्लॅट घ्यायचा आहे. त्यासाठी भरपूर पर्याय पाहता आले. माझे घराचे स्वप्न साकार होण्याची आशा वाटते.
आशिष आझादे, मेकॅनिकल इंजिनिअर ः वैयक्तिक अनेक गृहप्रकल्पांना भेटी दिल्या; परंतु प्रदर्शनात भरपूर प्रकल्पांची माहिती मिळाली. निगडी, हिंजवडी येथे गुंतवणूक करण्यासाठी फ्लॅट घेत आहे. प्रदर्शन समाधानकारक वाटले. ‘साइट व्हिजिट’देखील केली.

Web Title: sakal vastu 2017