‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ शनिवारपासून

Sakal-Vastu-Expo
Sakal-Vastu-Expo

पुणे - घरखरेदीसाठीचा शोध संपविणाऱ्या लोकप्रिय ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो २०१९’चे आयोजन ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे करण्यात आले आहे. शनिवार (ता. १६) पासून दोन दिवस हा एक्‍स्पो चालणार आहे. शिवाजीनगर येथील हॉटेल प्राइडमध्ये या एक्‍स्पोचे आयोजन केले आहे.

‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’मध्ये नामवंत बांधकाम कंपन्यांचे रेरा नोंदणीकृत असलेल्या गृहप्रकल्पांमधील आवाक्‍यातील घरे, आरामदायी सदनिकांपासून आलिशान पेंट हाउस, बंगला आदी विविध प्रकारांतील वास्तू संदर्भाने इत्यंभूत माहिती, तसेच संबंधित गृहप्रकल्पांमधून मिळणाऱ्या सुविधा, लोकेशन, आसपासचा विकसनशील परिसर या व अशा शंकांचे समाधान करण्यासाठी हा ‘एक्‍स्पो’ मदतीचा ठरणार आहे. 

केंद्रीय अर्थसंकल्पात सामान्य घरखरेदीदार, तसेच गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देणाऱ्या अनेक तरतुदी केलेल्या आहेत. तसेच, चालू आर्थिक वर्ष (२०१८-१९) संपण्यासाठी महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ ग्राहक व गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरणार आहे. यामध्ये ३० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या १५० हून अधिक गृह व व्यावसायिक प्रकल्पांची माहिती उपलब्ध असणार आहे.

पीएमआरडीए, मेट्रो, रिंगरोड, स्मार्ट सिटी आदी विविध महत्त्वाकांक्षी विकास योजनांमुळे पुणे महानगराचा गतीने विकास होत आहे. अशा वेळी आपल्याला हवे असलेले लोकेशन, तेथील गृहप्रकल्प, बजेट, उपलब्ध सुविधा, फायदेशीर गुंतवणूक... या व अशा विविध बाबींसंबंधाने एकाच छताखाली माहिती ग्राहकांना यामधून करून घेता येणार आहे. तसेच, बांधकाम कंपन्यांतर्फे दिल्या जाणाऱ्या सवलतींचा लाभही ग्राहकांना मिळू शकणार आहे.

वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पोविषयी... 
  कधी : १६ व १७ फेब्रुवारी २०१९ 
  कुठे : हॉटेल प्राईड, विद्यापीठ रस्ता, शिवाजीनगर 
  वेळ : सकाळी ११ ते रात्री ८ 
  सुविधा ः प्रवेश व पार्किंग विनामूल्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com