‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ला प्रतिसाद

प्राइड हॉटेल - ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ गृहप्रकल्प प्रदर्शनात ग्राहकांना माहिती देताना गृहप्रकल्पाचे कर्मचारी.
प्राइड हॉटेल - ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ गृहप्रकल्प प्रदर्शनात ग्राहकांना माहिती देताना गृहप्रकल्पाचे कर्मचारी.

पुणे - निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसरात हक्काचा बंगलो, फार्महाउस, फ्लॅट, प्लॉट सर्वांनाच हवा असतो. पण त्याची इत्थंभूत माहिती नक्की कुठून मिळवायची याची कल्पना ग्राहकांना नसते. यासाठीच हक्काचे घर असावे, असे वाटणाऱ्या प्रत्येकाला ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो २०१९’च्या गृहप्रकल्प प्रदर्शनाद्वारे एक संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. १६ ते १७ फेब्रुवारीदरम्यान शिवाजीनगर येथील प्राइड हॉटेलमध्ये पार पडलेल्या या प्रदर्शनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गृहप्रकल्पांसोबतच नागरिकांना आर्थिक साह्य मिळावे यासाठी अनेक फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधीदेखील येथे होते. मुख्य शहरापासून काही किलोमीटरच्या अंतरावर, किंवा उपनगरांमध्ये आपल्या स्वप्नातील घर मिळावे अशी अनेकांची इच्छा असते. रस्ता, पाणी, आरोग्यसेवा, मुलांसाठी चांगली शाळा, महाविद्यालये जवळ असणारी ठिकाणे पाहून घर घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे या ठिकाणी येणारे नागरिक सांगत होते. एकाच वेळी अनेक विकसकांच्या गृहप्रकल्पांची माहिती ग्राहकांना एकाच ठिकाणी मिळाल्यामुळे वेळही वाचला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी या वेळी दिली.

या प्रदर्शनामुळे अनेक गृहप्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळाली. प्रत्येक प्रकल्पातील घरांच्या किमती, परिसर व तेथील वैशिष्ट्यांची माहिती मिळाल्यामुळे योग्य घरांची निवड करणे सोपे झाले. सर्व प्रश्‍नांची उत्तरे या ठिकाणी मिळाली.
- निखिल पाटील, ग्राहक

‘जन घर’ योजनेलाही प्रतिसाद
फक्त १ लाखात हक्काचे घर देऊन त्यावरील सर्व सरकारी खर्च माफ करणाऱ्या भारतीय ‘जन घर’योजनेच्या गृहप्रकल्पांची माहिती देणारे दालनही या प्रदर्शनात होते. यालाही ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com