घरखरेदी उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

पुणे - घरांच्या किमती आवाक्‍यात असल्याने घर घेण्यासाठीची हीच योग्य वेळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. स्थावर मालमत्तेच्या गुंतवणुकीतील सर्वोत्तम पर्याय म्हणून घराकडे पाहिले जाते. याचाच विचार करून पुणेकरांना घरखरेदीसाठीचे भरपूर पर्याय एकाच छताखाली पाहायला मिळावेत, म्हणून ‘सकाळ माध्यम समूह’तर्फे शनिवारी (ता. १०) आणि रविवारी (ता.११) भव्य ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे.

शहराच्या कोणत्या परिसरातील घरांच्या किमती किती आहेत, कोणत्या भागात घर घेणे परवडणारे आहे यासाठी प्रत्येकवेळी शहरभर फिरणेही शक्‍य नाही. प्रत्येकाला स्वत:च्या हक्काच्या घरात राहायचे असते. पण कोणत्या ना कोणत्या अडचणीमुळे भाड्याच्या घरात राहावे लागते. अनेकांना ऑफिसपासून बऱ्याच अंतरावर राहण्याची तडजोड करावी लागते, तर काही जणांना मनपसंत घरात राहण्यासाठी दिवसेंदिवस वाट पाहत बसावी लागते. या सर्व प्रश्‍नांवर प्रभावी तोडगा ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ आहे. 

यात परवडणाऱ्या घरांपासून लक्‍झ्युरियस घरांपर्यंत सर्व प्रकारच्या घरांची मोठी शृंखला पाहायला मिळेल. पुण्याभोवतीच्या ५० बांधकाम व्यावसायिकांच्या ३०० पेक्षा जास्त बांधकाम प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्याने हव्या त्या परिसरातील प्रकल्पाची आपण निवड करू शकतो. घरासोबत मिळणाऱ्या सुविधा, ॲमेनिटीज, घराचे लोकेशन अशा सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी हा एक्‍स्पो प्रभावी ठरेल.

सकाळ वास्तू प्रॉपर्टी एक्‍स्पो
कधी : १०,११ डिसेंबर २०१६
कुठे : दि ऑर्चिड हॉटेल, बालेवाडी स्टेडियमजवळ, म्हाळुंगे
वेळ : सकाळी १० ते रात्री ८
प्रवेश व पार्किंग मोफत

तुमची आवड अन्‌ सोय
रिअल इस्टेटशी निगडित होमलोनपासून फायनान्सपर्यंतच्या सर्व प्रश्‍नांबाबतच्या शंकांचे समाधान या एक्‍स्पोतून होणार आहे. तुमचे बजेट, तुमची इच्छा, तुमची आवड आणि तुमची सोय अशा प्रत्येक प्रश्‍नाचे योग्य उत्तर या एक्‍स्पोमधून मिळू शकते.

Web Title: sakal vastu expo