अनेक ग्राहकांना लाभला ‘गृहमुहूर्त’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ऑटोक्‍लस्टर येथे आयोजित ‘गृहमुहूर्त’ या वास्तूविषयक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील अनेक नागरिकांनी प्रदर्शनाला सहकुटुंब भेट देऊन दसरा-दिवाळीचा शुभमुहूर्तावर नवीन घर घेण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.

पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ऑटोक्‍लस्टर येथे आयोजित ‘गृहमुहूर्त’ या वास्तूविषयक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील अनेक नागरिकांनी प्रदर्शनाला सहकुटुंब भेट देऊन दसरा-दिवाळीचा शुभमुहूर्तावर नवीन घर घेण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.

या प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. प्रदर्शनात १ बीएचकेपासून ३ बीएचके आलिशान फ्लॅट्‌स, बंगलो प्लॉट्‌स आदींची माहिती देणारे विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते. २ बीएचके फ्लॅटच्या रकमेत ३ बीएचके फ्लॅट घ्या, शून्य टक्के प्रोसेसिंग फी, नो प्री-ईएमआय कॉस्ट यांसारख्या अनेक ऑफर बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांना दिल्या होत्या. चिंचवड, रावेत, चिखली, मोशी प्राधिकरण, चऱ्होली, आदी ठिकाणांना नागरिकांची पसंती दिसून आली. प्रदर्शनातील स्टॉल्सला भेट देऊन नागरिक आवर्जून जाणून घेत होते. तत्काळ स्पॉट बुकिंगवर काही विशेष सवलतीही नागरिकांना देण्यात आल्या.

मावळ, तळेगाव-दाभाडे परिसरात ‘बंगला बनाओ, फ्लॅट भूल जाओ’ अशा टॅगलाइन देत बंगला घेण्यासाठी क्‍लीअर टायटल आणि पीएमआरडीए मंजुरीप्राप्त जागांचीही माहिती ग्राहकांना प्रदर्शनात देण्यात आली. इको फ्रेंडली फ्लॅट्‌सच्या स्टॉल्सलाही प्रदर्शनामध्ये ग्राहकांनी भेटी दिल्या.

बांधकाम व्यावसायिक, ग्राहक प्रतिक्रिया 
परेश सोळंकी, संचालक, गिरिराज असोसिएट्‌स -
 प्रदर्शनाच्या दोन्ही दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्यक्ष साइट व्हिजिटही झाल्या आहेत. रेडीपझेशन घर घेण्याकडे कल दिसून आला. विविध ऑफर्सचा फायदा घेऊन ग्राहक आपले हक्काचे घर नक्कीच घेईल. 

प्रतीक्षा पवार, तळेगाव (गृहिणी) - निगडी किंवा चिंचवडमध्ये दोन किंवा तीन बीएचके फ्लॅट घ्यायचा आहे. एक दोन प्रकल्प आवडले आहेत. प्रदर्शनात बरीच माहिती मिळाली. चर्चा व विचार करून फ्लॅटची निवड करू. 

बाजीराव मांढरेकर, पिंपळे गुरव नोकरदार) - तळेगाव किंवा चिखली-मोशी येथे १ बीएचके फ्लॅट घ्यायचा आहे. पहिल्यांदाच ‘सकाळ’च्या प्रदर्शनाला भेट दिली. निरनिराळ्या ठिकाणचे पर्याय जाणून घेता आले. त्यांच्या दराची तुलना करता आली. साइट व्हिजिट करणार आहे.

मेघा गुन्हाने, वाकड (नोकरदार) - आम्ही पती-पत्नी तळेगाव व हिंजवडी येथे काम करतो. त्यामुळे आम्हाला रावेत ते वाकड यादरम्यान २ बीएचके फ्लॅट घ्यायचा आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या ऑफर्स समाधानकारक होत्या. मात्र, काही ठिकाणी लोकेशननुसार दर जास्त वाटले. लवकरच साइट व्हिजिट करणार आहे.

अनिरुद्ध पाटील, चिंचवड (नोकरदार) - मोशी येथे २ बीएचके फ्लॅट घ्यायचा आहे. त्यासाठी चार ते पाच गृहप्रकल्प पसंत पडले आहेत. त्यांचे दर बजेटमध्ये आहेत. दसरा-दिवाळीच्या चांगल्या ऑफर्सही दिसून आल्या. दिवाळीपर्यंत नवीन फ्लॅटसाठी बुकिंग करणार असून, साइट व्हिजिटही करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Vastu Expo 2019