‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’चे उद्यापासून सुरुवात

Sakal-Vastu
Sakal-Vastu

पुणे - मनासारखे घर घ्यायचे आहे; पण ते कुठे घ्यायचे, त्याचे बजेट काय, ॲमिनिटीज काय, या सर्व प्रश्‍नांवर प्रभावी तोडगा म्हणून सकाळ माध्यम समूहाने ‘वास्तू एक्‍स्पो : २०१९’चे आयोजन केले आहे. शिवाजीनगर येथील प्राइड हॉटेल येथे शनिवार (ता. १२) आणि रविवारी (ता. १३) हा एक्‍स्पो होणार आहे. 

परवडणाऱ्या घरांपासून आलिशान घरांपर्यंत सर्व काही, घरासोबत मिळणाऱ्या सुविधा, ॲमेनिटीज्‌, लोकेशन, आसपासचा परिसर असे विविध पर्याय बघण्यासाठी हा एक्‍स्पो प्रभावी ठरणार आहे. १५ लाखांपासून १ कोटीपर्यंत बजेट असलेली घरे, तसेच एन.ए. प्लॉट्‌स यामध्ये बघावयास मिळणार आहेत.

एक्‍स्पोमध्ये तीसहून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या दीडशेहून अधिक प्रकल्पांची माहिती उपलब्ध होणार आहे. पुण्याच्या चौफेर उभे राहणारे प्रकल्प आणि पुण्याबाहेरील प्रकल्पांचीही सविस्तर माहिती इथे मिळणार आहे. शहर व परिसरातील कमर्शिअल व रेसिडेन्शिअल प्रोजेक्‍टसची माहिती यामध्ये उपलब्ध आहे. 

पुण्याभोवतीचे प्रकल्प, त्यांचे बजेट, कोणत्या प्रकल्पांमधून कोणत्या सुविधा मिळणार, कोणत्या ठिकाणी पैसे गुंतविणे जास्त फायद्याचे राहू शकते, त्या परिसराचा विकास कसा होतो आहे, अशा विविध प्रश्‍नांसोबतच रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय यानिमित्ताने पाहता येणार आहेत. तुमच्या मनातील घराची निवड करण्यासाठी हा एक्‍स्पो फायदेशीर ठरू शकणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com