‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ आजपासून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

कधी - १२, १३ ऑक्‍टोबर 
वेळ - सकाळी ११ ते रात्री ८ 
कुठे - प्राइड हॉटेल, शिवाजीनगर, पुणे 
प्रवेश - विनामूल्य

पुणे - मनासारखे घर घ्यायचे तर मग ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ला जायलाच हवे. शनिवारी (ता. १२) आणि रविवारी (ता. १३) प्राइड हॉटेल, शिवाजीनगर येथे ‘सकाळ’ माध्यम समूहाने या एक्‍स्पोचे आयोजन केले आहे. यात पुणेकरांना तीसहून अधिक बांधकाम व्यावसायिकांचे १५० हून अधिक प्रकल्प बघावयास मिळणार आहेत. एक्‍स्पोचे बॅंकिंग पार्टनर युनियन बॅंक ऑफ इंडिया आहे. बॅंक ऑफ इंडियाच्या आकर्षक गृहकर्ज योजनांची माहिती; तसेच गृहकर्जासाठी व्याजदर (फ्लोटिंग), शून्य प्रक्रिया शुल्क, परतफेडीच्या लवचिक पद्धती याविषयी ‘एक्‍स्पो’मध्ये अधिक जाणून घेता येईल. यामुळे आता घर घेणे सोपे होणार आहे. यात परवडणाऱ्या घरांची मोठी शृंखला सादर केली जाणार आहे. 

परवडणाऱ्या घरांपासून आलिशान घरापर्यंत सर्व काही, शिवाय घरासोबत मिळणाऱ्या सुविधा, ॲमेनिटीज, लोकेशन, आसपासचा परिसर अशा सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी हा एक्‍स्पो प्रभावी ठरणार आहे. पुण्याभोवतीचे प्रकल्प, त्यांचे बजेट, विविध प्रकल्पांमधील सुविधा, पैसे गुंतविण्यासाठी फायदेशीर ठिकाणे, त्या परिसराच्या विकासाची दिशा अशा मुद्यांसोबतच रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय एक्‍स्पोमध्ये पाहता येणार आहेत.

साधारणतः ९ लाख रुपयांपासून २ कोटी रुपयांपर्यंतची घरे बघावयास मिळणार आहेत. गृहखरेदीदारांचे बजेट, इच्छा, आवड, सोय याविषयी अधिक माहिती या एक्‍स्पोमधून मिळू शकेल. तेव्हा गृहखरेदीचा निर्णय घ्यायलाच हवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal vastu Expo 2019 exhibition