‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’तून पूर्ण होणार घराचे स्वप्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पिंपरी - आयटी हब आणि ऑटो हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत स्वतःच्या मालकीचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण होण्याचे दिवस जवळ आले आहेत. ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवारी (ता. २६) आणि रविवारी (ता. २७) ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ आयोजित केला आहे. दोन्ही दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ८ पर्यंत चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर येथे हा एक्‍स्पो सर्वांसाठी खुला आहे.

पिंपरी - आयटी हब आणि ऑटो हब म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत स्वतःच्या मालकीचे घर असण्याचे स्वप्न पूर्ण होण्याचे दिवस जवळ आले आहेत. ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवारी (ता. २६) आणि रविवारी (ता. २७) ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ आयोजित केला आहे. दोन्ही दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ८ पर्यंत चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर येथे हा एक्‍स्पो सर्वांसाठी खुला आहे.

या एक्‍स्पोबाबत विविध बांधकाम व्यावसायिकांनी ‘सकाळ’कडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
अनुप जमतानी, संचालक, जमतानी ग्रुप -
 आमच्या ग्रुपमार्फत, हिंजवडी, रावेत, पुनावळे अशा सहा ठिकाणी गृहप्रकल्प होत आहेत. तर रहाटणी येथे व्यावसायिकांसाठी प्रकल्प होत आहे. चऱ्होली येथील नवीन प्रकल्पासाठी ग्राहकांना शून्य ‘जीएसटी’ची विशेष ऑफर देत आहोत. प्रकल्पातील सदनिका परवडणाऱ्या आहेत. ‘सकाळ’ वास्तू प्रदर्शन मध्यवर्ती ठिकाणी भरविले जात असून त्याचा ग्राहकांना फायदा होईल.

रवींद्र नामदे, संचालक, नम्रता कन्स्ट्रक्‍शन्स - चालू वर्षापासून बांधकाम क्षेत्राची परिस्थिती सुधारत चालली आहे. वाकड, रावेतसारख्या नव्याने विकसित होत असलेल्या भागांत आमचे ३५ लाख रुपयांपासून ५० लाखांपर्यंतचे २-बीएचके बजेट फ्लॅट उपलब्ध आहेत. बॅंकांचे व्याजदरदेखील स्थिर आहेत. सकाळ वास्तू प्रदर्शनामुळे ग्राहकांना स्वतःच्या पसंतीचे भरपूर पर्याय पाहून त्यामधून निवडता येतील.

जितेंद्र सोनिगरा, संचालक, सोनिगरा डेव्हलपर्स - शहर आणि परिसरात रिंगरोड, मेट्रो यासारख्या महत्त्वाच्या विकास योजना राबविल्या जात आहेत. तेथे विशेषतः हिंजवडी, रावेत, मारुंजी, नेरे येथे आमचे गृह प्रकल्प चालू असून, याच भागांत प्लॉट ग्राहकांना उपलब्ध करून देत आहोत. वास्तू प्रदर्शन हे ग्राहकांना प्रत्यक्ष भेटण्याचे उत्तम व्यासपीठ आहे. बाजारात स्थिरता आहे. ग्राहकांना निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे.

सागर मारणे, संचालक एव्ही कॉर्पोरेशन - ‘सकाळ’ची वास्तू प्रदर्शनाची संकल्पना चांगली आहे. बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांना एकत्रित येण्याचे हे उत्तम ठिकाण आहे. आमचे जाधववाडी येथे १ व २-बीएचके आणि व्यावसायिकांसाठी प्रकल्प चालू आहेत. आम्ही छुपे शुल्क आकारत नाही. प्रत्येकाच्या बजेटला साजेशी स्वस्त आणि सर्वोत्तम घरे उपलब्ध करून देत आहोत.

तात्यासाहेब शेवाळे, संचालक, शेवाळे अँड कंपनी- सध्या गृहकर्जाचे व्याजदर ८.३५ टक्‍क्‍यांपासून पुढे ९.२५ टक्के इतके आहेत. ‘एलआयसी’चे व्याजदर ८.३५ टक्‍क्‍यांपासून सुरू होतात. बॅंका, फायनान्स कंपन्यांना ग्राहकांची गरज असून, जास्तीत जास्त गृहकर्ज उपलब्ध करून देण्यास उत्सुक आहेत. घरे खरेदीसाठी हे वातावरण पोषक आहे.

Web Title: sakal vastu expo home