दसऱ्याला साधा ‘गृहमुहूर्त’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

कधी, कुठे, केव्हा
कधी - ५ व ६ ऑक्‍टोबर
कुठे - ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर, सायन्स पार्कजवळ, चिंचवड
वेळ - सकाळी ११ ते रात्री ८

पिंपरी - दसऱ्याच्या मुहूर्तावर हक्काचं घर घेण्याची सुवर्णसंधी ‘सकाळ माध्यम समूहा’ने नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी शनिवार (ता. ५) व रविवारी (ता. ६) चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटरमध्ये ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’चे आयोजन केले आहे.

शहराच्या विविध भागातील ‘रेरा’ नोंदणीकृत गृहप्रकल्पांची माहिती ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’मध्ये एकाच ठिकाणी मिळणार आहे. शहर परिसरातील प्रकल्प, त्यांचे बजेट, कोणत्या प्रकल्पांमधून कोणत्या सुविधा मिळणार, कोणत्या ठिकाणी पैसे गुंतविणे जास्त फायद्याचे होऊ शकते, तेथील परिसराचा विकास कसा होतो आहे, अशा विविध प्रश्‍नांसोबतच रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय पाहता येणार आहेत. तुमचे बजेट, इच्छा, आवड, सोयी अशा प्रत्येक प्रश्‍नाचे योग्य उत्तर या ‘एक्‍स्पो’मधून मिळू शकते. त्यामुळे हा ‘एक्‍स्पो’ तुमच्या मनातील घर पूर्ण करण्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. यात १५ लाखांपासून पुढील किमतीची घरे उपलब्ध आहेत. निसर्गरम्य ‘सेकंड होम’साठी आकर्षक ‘प्लॉट’चे पर्यायही उपलब्ध आहेत.

बजेट होम्स ते स्मार्ट होम्सपर्यंत सर्व काही, शिवाय घरासोबत मिळणाऱ्या सुविधा, ॲमेनिटीज्‌, लोकेशन, आसपासचा परिसर अशा सर्व शंकांचे समाधान करण्यासाठी हा ‘एक्‍स्पो’ प्रभावी ठरणार आहे. त्यासाठी या प्रदर्शनात एकाच छताखाली सर्व प्रकल्पांतील घरांची माहिती मिळणे ही ग्राहकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. तसेच दसऱ्याच्या मुहूर्तावर स्पॉट बुकिंग ऑफर, नामवंत बांधकाम व्यावसायिकांमार्फत दिल्या जाणाऱ्या सवलती आणि ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal vastu Expo Home Dasara Muhurt