'घराचे स्वप्न करा साकार'

sakal-vastu-expo
sakal-vastu-expo

पुणे - शहराच्या विविध भागांत गृहप्रकल्पांचे अनेक पर्याय, व्यावसायिक जागा आणि एनए प्लॉट एकाच छताखाली पाहण्याची संधी पुणेकरांना ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’मधून उपलब्ध झाली आहे. ‘युनियन बॅंक ऑफ इंडिया’चे उपविभागीय प्रमुख (पुणे झोन) विजय डोंगरवार यांच्या हस्ते या एक्‍स्पोचे शनिवारी उद्‌घाटन झाले.  

घराबाबत असलेल्या विविध प्रश्‍नांवर प्रभावी तोडगा म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’ने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

बॅंकेचे उपप्रादेशिक प्रमुख सुरेश कुंभार, अतिरिक्त महाव्यवस्थापक राम तिवारी, विपणन विभागाचे मुख्य व्यवस्थापक ललित गोरख, युनियन लोन पॉइंट विभागाचे प्रमुख चंद्रशेखर लोखंडे, मुख्य व्यवस्थापक नितीन गौंडाजे, ‘सत्यम बिल्डर्स’चे संचालक राजेश बन्सल, ‘सॉलिटर’च्या विपणन विभागाचे व्यवस्थापक सागर कटकमवार, ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक शैलेश पाटील आदी या वेळी उपस्थित होते. परवडणाऱ्या घरांपासून आलिशान घरांचे विविध पर्याय, घरासोबत मिळणाऱ्या सुविधा, ॲमेनिटीज, लोकेशन, आसपासचा परिसर आदी बघण्यासाठी हा एक्‍स्पो प्रभावी ठरत आहे. १५ लाखांपासून दोन कोटी रुपयांपर्यंत बजेट असलेली घरे, व्यावसायिक शॉप आणि एनए प्लॉट्‌स या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. तीसहून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या दीडशेहून अधिक प्रकल्पांची माहिती यात मिळत आहे. पुण्याभोवतीचे प्रकल्प, त्यांचे बजेट, प्रकल्पांत कोणत्या सुविधा मिळणार, कोणत्या ठिकाणी पैसे गुंतविणे जास्त फायद्याचे राहू शकते, तेथील परिसराचा विकास कसा होतो आहे, अशा विविध प्रश्‍नांसोबत रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचे विविध पर्याय या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. त्यामुळे हा एक्‍स्पो तुमच्या मनातील घराची निवड करण्यासाठी निश्‍चित फायदेशीर ठरू शकतो. 

एकाच ठिकाणी अनेक पर्याय उपलब्ध असल्याने नागरिकांना त्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणे सोपे झाले आहे. आम्हाला नेहमीच चांगला अनुभव आला आहे. दिवाळीपर्यंत बुकिंग केल्यास एनआयबीएम येथे असलेल्या सेंट्रीया प्रकल्पावर  आकर्षक ऑफर देण्यात आली आहे. 
-कोलते-पाटील डेव्हलपर्स

कधी आणि कुठे...
  कधी : रविवारपर्यंत      (ता. १३)
  वेळ : सकाळी      ११ ते रात्री ८ 
  कुठे : प्राइड हॉटेल, शिवाजीनगर, 
  प्रवेश : विनामूल्य  

शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक एक्‍स्पोच्या निमित्ताने एका छताखाली आले आहेत. प्रत्येकाला स्वतःचे घर मिळावे, अशी सरकारची इच्छा आहे. त्यासाठी गरज असलेल्या प्रत्येकाला गृहकर्ज उपलब्ध करून देण्यास आम्ही तत्पर आहोत. पाच दिवसांत कर्ज देण्याची यंत्रणा आम्ही निर्माण केली आहे. एक्‍स्पोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- विजय डोंगरवार, उपविभागीय प्रमुख (पुणे झोन), युनियन बॅंक ऑफ इंडिया  

एक्‍स्पो सुरू झाल्यापासून पहिल्या दोन तासांतच आम्हाला मोठा प्रतिसाद मिळाला. हाच अनुभव यापूर्वीदेखील आला आहे. ‘सकाळ’चा वाचकांच्या मनावर ठसा आहे. त्याचा फायदा बांधकाम व्यावसायिकांना एक्‍स्पोच्या माध्यमातून होत आहे. मंदीला तडा देत हे प्रदर्शन यशस्वी होईल. विविध  पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकदेखील खूष होत आहेत.
- राजेश बन्सल, संचालक, सत्यम बिल्डर्स

आम्ही पहिल्यांदाच एक्‍स्पोमध्ये सहभागी झालो आहोत. एक्‍स्पोचे चांगले नियोजन केलेले असून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमच्या तीन प्रकल्पांची माहिती या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. त्यातील दोन प्रकल्प व्यावसायिक जागांचे; तर एक गृहप्रकल्प आहे. 
- सागर कटकमवार,  विपणन विभागाचे व्यवस्थापक, सॉलिटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com