Sakal Vastu Property Expo 2022 : मनपसंत घरखरेदी, गुंतवणुकीसाठी आज अखेरचा दिवस

आपल्या स्वप्नातील घराची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ‘सकाळ’च्या वतीने एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Sakal Vastu Property Expo 2022
Sakal Vastu Property Expo 2022sakal
Summary

आपल्या स्वप्नातील घराची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ‘सकाळ’च्या वतीने एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

औंध - आपल्या स्वप्नातील घराची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ‘सकाळ’च्या वतीने एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गृहनिर्माण प्रकल्पांच्या दोन दिवसांच्या ‘सकाळ वास्तू’ प्रदर्शनाचे उद्‍घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते आणि पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए. बी. विजयकुमार यांच्या उपस्थितीत शनिवारी झाले. रविवार (ता. ११) हा प्रदर्शनाचा अखेरचा दिवस आहे.

बाणेर येथील माउली गार्डन येथे रविवारपर्यंत (ता. ११) भरलेल्या या प्रदर्शनात घर खरेदी करणाऱ्यांना विविध प्रकारचे पर्याय तसेच गृहकर्ज योजना यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुणे शहरात वेगाने विकसित होत असलेल्या पश्चिम उपनगरातील महत्त्वाच्या बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण परिसरात घर खरेदी करण्यासाठी अनेकजणांकडून प्राधान्य दिले जात आहे. बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात समन्वय साधला जावा यासाठी सकाळतर्फे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यात पुण्यातील नामांकित बांधकाम व्यवसायातील ग्रुप, बॅंका यांचे स्टॉल असून यामध्ये ग्राहकांना आपल्या निवडीनुसार सदनिका खरेदी करण्यासाठी लागणारी तसेच बॅंकेचे कर्ज प्रकरणापर्यंतची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

सर्व प्रकारच्या दरातील उपलब्ध सदनिका, मोकळे प्लॉट याठिकाणी माहिती घेण्यासह खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे.

वास्तू प्रदर्शनात ग्राहकांच्या प्रतिसादाचा चांगला अनुभव येत आहे. सध्या अनेकजण बाणेर, बालेवाडी, पाषाण, बाणेर रस्ता परिसरात रहिवासी सदनिका, अपार्टमेंट, बंगलो, रो हाऊस घेण्यासाठी पसंती दर्शवत असून अशा ग्राहकांसाठी अनेक गृहप्रकल्पांमध्ये गरजेनुसार सदनिका उपलब्ध आहेत. घर खरेदी करताना निर्माण होणाऱ्या शंकांचे निरसनही येथे होणार आहे. बऱ्याच जणांना आपल्याला हक्काचे घर असावे यासाठी जमवलेली पुंजीची योग्य व विश्वसनीय ठिकाणी गुंतवणूक करायची असते अशा सर्वांसाठी हा ‘वास्तू प्रॉपर्टी एक्स्पो’ महत्त्वाचा ठरणार आहे. तरी आपल्या कुटुंबाची गरज लक्षात घेता सदनिका, रो-हाऊस, एनए प्लॉट खरेदी करू इच्छिणारांना नक्कीच या प्रदर्शनाचा लाभ होणार आहे.

लोकहिताचे उपक्रम ‘सकाळ’च्या वतीने नेहमीच राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून या वास्तू प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यात समन्वय साधला जावा यासाठी केलेला हा प्रयत्न कौतुकास्पद आहे, तसेच या माध्यमातून योग्य प्रकारचे घर खरेदी केल्याचे समाधान ग्राहकांना मिळते, याचा आम्हाला आनंद आहे आणि ‘सकाळ’चे कौतुक आहे.

- सिद्धार्थ शिरोळे, आमदार, शिवाजीनगर विधानसभा

पश्चिम पुण्यातील विकसित होणाऱ्या या भागात अनेक जण विश्वासाने घर खरेदी करण्यासाठी या वास्तू प्रदर्शनात येतात. यामुळे नक्कीच सकारात्मक उपक्रम आहे. या माध्यमातून अनेक जणांना योग्य किमतीत आणि हवे तसे घर खरेदी करण्याची संधी मिळते, ही ग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे, तसेच व्यावसायिकांना देखील एकाच ठिकाणी अनेकांच्या गरजा काय आहेत हे लक्षात येते. त्यानुसार प्रकल्प उभारले जातात.

- संदीप कर्णिक, पोलिस सहआयुक्त

आज ‘सकाळ’सोबत आम्ही या प्रदर्शनात सहभागी असून 'सकाळ’चे उपक्रम खूप चांगले असतात. या प्रदर्शनास ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या दोनदिवसीय प्रदर्शनात गृहकर्जासाठी आमच्या योजनांचा ग्राहकांना नक्कीच लाभ होईल.

- ए. बी. विजयकुमार, कार्यकारी संचालक, बॅंक ऑफ महाराष्ट्र

‘सकाळ’च्या अशा प्रदर्शनात आमच्या ब्रॅण्डची किंमत तर वाढतेच, त्याचबरोबर आमचे नवनवीन प्रकल्प ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी फायदा होतो. वाढत्या पुण्याचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या बाणेर परिसरात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याने आम्हाला फायदेशीर असून ग्राहकांनादेखील सोयीचे आहे. गेली चाळीस वर्षे आम्ही या क्षेत्रात कार्यरत असून, पुण्यात घरोघरी आमचा ब्रॅण्ड पोहोचवण्यात ‘सकाळ’चे मोठे सहकार्य लाभले आहे आणि याचा आम्हाला नक्कीच फायदा झाला आहे.

- सुभाष सांकला, व्यवस्थापकीय संचालक, सांकला बिल्डकॉन

‘सकाळ’च्या या प्रदर्शनात आम्ही सहभागी आहोत याचा आनंदच आहे. या प्रदर्शनामुळे आम्हाला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते. पुण्यातील झपाट्याने विकसित होणारा भाग असलेल्या बालेवाडी हायस्ट्रीट येथे आमचा नवा प्रकल्प असून, दळणवळणाची साधने उपलब्ध असल्याने ग्राहकांना हा प्रकल्प फायदेशीर ठरणार आहे. गतीने विकसित होत असल्याने सदनिका खरेदीसाठी मागणीत वाढ होत आहे. नंदनचे अनेक प्रकल्प या भागात असून, यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे.

- शामकांत कोतकर, व्यवस्थाकीय संचालक, नंदन बिल्डकॉन

वास्तू प्रदर्शन

  • कुठे - माउली गार्डन, माउली पेट्रोल पंपाजवळ बाणेर

  • वेळ - सकाळी १० ते रात्री ८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com