बारामतीत उद्या करिअर मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

बारामती - दहावीच्या निकालानंतर शाखा कोणत्या निवडायच्या? बारावी झाली, आता काय करायचे? हा प्रश्न केवळ विद्यार्थ्यांपुढेच नाही, तर पालकांपुढेही आहे. सध्या प्रवेशाची घाई गडबडही सुरू आहे. मात्र, प्रवेश घेताना काळजीपूर्वक घेतला तर पुढील अनेक समस्यांवर आताच उत्तरे मिळतील, म्हणूनच सकाळ विद्या व बारामतीतील शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या एक्‍सीड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने रविवारी (ता. १७) होत असलेल्या दहावी-बारावी करिअरविषयक चर्चासत्रास आवर्जून भेट द्या.

विवेक वेलणकर तसेच विविध शाखांमधील नामवंत तज्ज्ञांपर्यंतचे वक्ते करिअरच्या विविध क्षेत्रांतील टिप्स देणार आहेत. येथील वसंतराव पवार नाट्यगृहात रविवारी सकाळी साडेदहा वाजता हे चर्चासत्र होणार आहे. हे चर्चासत्र सर्वांसाठी खुले असून या चर्चासत्रातून विविध शाखांमधील प्रवेशासाठी असलेल्या शंका दूर होण्यास निश्‍चितच मदत होणार आहे. करिअरतज्ज्ञ विवेक वेलणकर हे दहावी, बारावी ते पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी व करिअरची माहिती देणार आहेत. आयआयटी मुंबई येथून बीटेक व एमटेक असलेले प्राध्यापक आशिष दुबे हे दहावीनंतरच्या विज्ञान शाखेच्या करिअरच्या संधींविषयी माहिती देणार आहेत. पुण्यातील श्रीयश ॲकॅडमीचे संचालक राजेंद्र म्हसवडे हे दहावीनंतरच्या वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधीविषयी माहिती देणार आहेत, तर पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई हेदेखील करिअरच्या विविध संधींची माहिती देणार आहेत.

 कधी - रविवार, १७ जून २०१८
 कुठे - वसंतराव पवार नाट्यगृह, बारामती.
 केव्हा - वेळ सकाळी साडेदहा वाजता.
 वक्ते - श्री. विवेक वेलणकर, डॉ. गिरीश देसाई, प्रा. आशिष दुबे व राजेंद्र म्हसवडे

Web Title: sakal vidya career guidance education