दहावीनंतर करिअरविषयी निगडी, मोशीत मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जून 2019

शनिवार, ८ जून 
केव्हा - सायं. ५.०० वाजता
कोठे - सीएमएस केरला भवन, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ, सेक्‍टर २६, प्राधिकरण, निगडी 

रविवार, ९ जून
केव्हा - सकाळी १०.३० वाजता
कोठे - हदय हॉल, हदय रेसिडेन्सी, प्लॉट नं.१८८, सेक्‍टर ४, संतनगर, मोशी प्राधिकरण 
विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य व मर्यादित.
अधिक माहितीसाठी संपर्क - ९५४५९५४७३३

पिंपरी - ‘सकाळ विद्या’ व ‘द लर्निंग लेन्स ॲकॅडमी’ने सातवी ते दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी दहावीनंतर करिअरच्या संधींविषयी मार्गदर्शन या विषयावर आकुर्डी प्राधिकरण व मोशी येथे विनामूल्य चर्चासत्रांचे आयोजन केले आहे. ही चर्चासत्रे शनिवारी (ता. ८) निगडी प्राधिकरण येथे; तर रविवारी (ता. ९) मोशी प्राधिकरण येथे होणार आहेत.

चर्चासत्रात दहावीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकलव्यतिरिक्त इतर पर्याय कोणते; तसेच विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांचा विचार करून करिअरची निवड कशी करावी, यावरही मार्गदर्शन मिळणार आहे. पुढील करिअरच्या दृष्टीने आठवी-नववीपासून फाउंडेशनची तयारी कशी करावी, दहावी झालेल्या विद्यार्थ्यांनी अकरावी व बारावी बोर्ड, स्पर्धा परीक्षा याचे दोन वर्षांत नियोजन कसे करावे, या सर्व विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. 

अकरावीत विषयांची निवड कशी करावी, चर्चासत्रात दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार दहावीच्या परीक्षेसाठी अभ्यासाच्या टिप्स दिल्या जातील; तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शिक्षणसंस्था आणि त्यांची प्रवेशप्रक्रिया, करिअरची निवड व स्पर्धा परीक्षांची तयारी याविषयी विद्यार्थ्यांना वैयक्तिक समुपदेशन केले जाईल. करिअर व दहावीच्या परीक्षेची तयारी याविषयीच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे या चर्चासत्रातून मिळतील. चर्चासत्रासाठी प्रवेश विनामूल्य पण, मर्यादित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Vidya Career Student After Tenth Guidance