शुक्रवारपासून ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ पुणे येथे

vidya
vidya

सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाची व प्रवेशप्रक्रियांची माहिती एकाच छताखाली
पुणे - दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर वेध लागतात ते कॉलेजचे व भावी करिअरचे. विद्यार्थी व पालकांना कॉलेज निवडीपासून ते करिअर निवडीपर्यंत कसरत करावी लागते.अशा वेळी योग्य पर्याय मिळणे गरजेचे असते. आयुष्याच्या याच टप्प्यावर योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते विद्यार्थ्यांना त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सकाळ माध्यम समूहातर्फे शुक्रवार (ता. ७), शनिवार (ता. ८) व रविवार (ता.९) रोजी गणेश कलाक्रिडामंच, स्वारगेट येथे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ होणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायाची माहिती व मार्गदर्शनपर सेमिनार आयोजित केले आहे. या एक्‍स्पोचे मुख्य प्रायोजक युनिक ॲकॅडमी, सह प्रायोजक मराठवाडा मित्रमंडळ आणि झील एज्युकेशन सोसायटी, उप प्रायोजक सृजन कॉलेज ऑफ डिझाईन, संदीप युनिव्हर्सिटी आहेत. 

ज्युनिअर कॉलेज, शाळा, कोचिंग क्‍लासेस, प्रोफेशनल कोर्सेस म्हणजेच केजी पासून पीएचडी पर्यंत सर्व पर्याय एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत.  वेगवेगळ्या शाखा, अनेक कॉलेज आणि  वक्‍त्यांची मार्गदर्शन व्याख्याने यांचा या प्रदर्शनात समावेश असणार आहे. त्याचबरोबर कॉलेजमधील प्रवेश, कॉलेजमधील उपलब्ध अभ्यासक्रम, आर्टस्‌, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, पॉलिटेक्‍निक, मेडिकल, हॉटेल मॅनेजमेंट, पॅरामेडिकल, आर्किटेक्‍चर, आयटी, इतर व्होकेशनल कोर्स, विशिष्ट विषयातील डिप्लोमा यांसारख्या विविध अभ्यासक्रमांची सखोल माहिती या प्रदर्शनातून घेता येणार आहे. या प्रदर्शनात पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत सर्वच क्षेत्रातील संधी, शिक्षण, त्याचबरोबर जेईई, नीट, सीईटी प्रवेशपरीक्षा, नागरी सेवा परीक्षा, स्पर्धा परीक्षा व त्यांची तयारी याची माहिती यांद्वारे पालक व विद्यार्थ्यांना घेता येईल. सर्व शैक्षणिक पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने शिक्षणसंस्था व विद्यार्थी यांमधील दुवा म्हणून हा एक्‍स्पो होणार आहे. 

महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियेसोबत विद्यार्थ्यांना विविध तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने सुद्धा आयोजित करण्यात आली आहेत. 
अनेक क्षेत्रातील करिअर, त्यातील संधी या विषयीची माहिती तसेच अनेक संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांबद्दल माहिती स्टॉलद्वारे विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. आठ प्रसिद्ध वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा विद्यार्थी व पालकांनी आवर्जून सहभागी व्हावे अशी ही संधी आहे. अधिक माहितीसाठी ९९२२९१३५१०, ९९२३६४५६७९ वर संपर्क साधावा.

सुहास कोकाटे
विषय - की टू सक्‍सेस इन्‌ कॉम्पीटिटिह एक्‍साम

विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्सास कसा करावा. तसेच विविध स्पर्धा परीक्षा जसे एमपीएससी, टॅक्‍स असिसट्‌न्स, तलाठी, मेगाभरती यांची माहिती, या परीक्षांची तयारी कशी करावी.
कोणासाठी उपयुक्त  : स्पर्धापरीक्षा देणारे, 
स्पर्धापरीक्षांसाठी उत्सुक असणारे सर्व विद्यार्थी.
कधी : शुक्रवार, ७ जून
केव्हा : सकाळी ११.०० वाजता

विवेक वेलणकर
विषय - आर्ट, कॉमर्स, डिझाईन, लॉ डिफेन्समधील करिअर आर्टस्‌, कॉमर्स,
सायन्स, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट,  डिझायनिंग, आर्किटेक्‍चर, मर्चंट नेव्ही, यांसारख्या विविध अभ्यासक्रमांची सखोल  माहिती ते आपल्या व्याख्यानात देणार आहेत.
कोणासाठी उपयुक्त : दहावी ते बारावीचे  विद्यार्थी व पालक
कधी : शनिवार, ८ जून
केव्हा : सकाळी १०.३० वाजता

अभय अभ्यंकर
विषय - २०१९ मधील इंजिनिअरिंग प्रवेशप्रक्रिया

इंजिनिअरिंगची प्रवेशप्रक्रिया, ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रवेशप्रक्रिया कशी आहे, फॉर्म कसा भरावा, कागदपत्रांची पडताळणी  या सगळ्या विषयी मार्गदर्शन. 
कोणासाठी  उपयुक्त : दहावी ते बारावीचे विद्यार्थी व पालक.
कधी : रविवार, ९ जून
केव्हा :  संध्याकाळी ६.०० वाजता
कोणासाठी उपयुक्त : इंजिनिअरिंगला प्रवेश घेणारे सर्व विद्यार्थी व पालक

हेमचंद्र शिंदे
विषय - मेडिकल, इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया

मेडिकल, इंजिनिअरिंगला प्रवेश घेताना ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करावे, कागदपत्रांची पडताळणी तसेच प्रेफरन्स फॉर्म कसा भरावा. पर्सेंटाईल म्हणजे काय या विषयीची माहिती. 
कोणासाठी उपयुक्त  : मेडिकल व इंजिनिअरिंगला जाणारे व उत्सुक असणारे सर्व विद्यार्थी.
कधी : शुक्रवार, ७ जून
केव्हा : संध्याकाळी ६.०० वाजता

प्रदीप खांदवे
विषय - पॉलिटेक्‍निक व इंजिनिअरिंग मधील करिअर

इंजिनिअरिंगच्या शाखा, त्यातील करिअर. पॉलिटेक्‍निकचे फायदे काय आहेत. तांत्रिक शिक्षणाचे भविष्य काय आहे, त्यातील संधी कोणत्या आहेत या विषयी ते मार्गदर्शन करतील. 
कोणासाठी उपयुक्त : इंजिनिअरिंगचे विद्यार्थी व इंजिनिअरिंगला प्रवेश घेणारे विद्यार्थी.
कधी : शनिवार, ८ जून
केव्हा : संध्याकाळी ६.३० वाजता

संतोष रासकर
विषय - डिझायनिंग क्षेत्रातील करिअर संधी

सध्या उदयास येणाऱ्या नवनवीन उद्योगामध्ये डिझायनिंगचे महत्त्व काय आहे? नव्या तंत्रज्ञानामुळे नवीन संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध झाल्या आहेत. या नवीन संधी विषयीची माहिती तसेच हे डिझायनिंगचे शिक्षण कसे घ्यायला हवे. त्यातील संधी कोणत्या आहेत याविषयी ते मार्गदर्शन करतील. 
कोणासाठी उपयुक्त : दहावी, बारावी, पदवीनंतरचे सर्व विद्यार्थी 
कधी : शनिवार, ८ जून
केव्हा : दुपारी ४.३० वाजता

मकरंद टिल्लू
विषय - आनंदाची बेरीज, यशाचा गुणाकार!

विद्यार्थ्यांवर येणारे पिअर प्रेशर व त्याचा सामना कसा करावा, विद्यार्थ्यांनी त्यांची ध्येये, त्याम्ची स्वप्ने साकार करताना व त्यातील करिअरमध्ये आनंद कसा शोधायचा या विषयावर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. 
कोणासाठी उपयुक्त : सर्व विद्यार्थी व पालक
कधी : शनिवार, ८ जून
केव्हा : सकाळी ११.३० वाजता

तुकाराम जाधव
विषय - सिव्हिल सर्व्हिसेस करिअर आणि परीक्षा, युपीएससी, एमपीएससी
अशा विविध स्पर्धा परीक्षा, या परीक्षांची तयारी कशी करावे. तसेच स्पर्धापरीक्षेत  यशस्वी कसे व्हावे याविषयी मार्गदर्शन तुकाराम जाधव सर करतील.
कोणासाठी उपयुक्त : स्पर्धापरीक्षा देणारे,. 
स्पर्धापरीक्षांसाठी उत्सुक असणारे सर्व विद्यार्थी.
कधी : रविवार, ९ जून
केव्हा : सकाळी ११.०० वाजता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com