सकाळ एज्युकेशन एक्‍स्पो उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९ 
कधी - शुक्रवार (ता. ७) ते रविवार (ता. ९)
केव्हा - सकाळी १० ते रात्री ८
कोठे - गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे
संपर्क - ९९२२९१३५१०, ९९२३६४५६७९ 
सुविधा - प्रवेश विनामूल्य

पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’चे आयोजन केले आहे. यामध्ये नामांकित शिक्षण संस्था सहभागी होणार आहेत. तसेच, विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर सेमिनारही आयोजित केले आहे. या एक्‍स्पोचे मुख्य प्रायोजक युनिक ॲकॅडमी, उप-प्रायोजक मराठवाडा मित्रमंडळ आणि झील एज्युकेशन सोसायटी व सहप्रायोजक सृजन कॉलेज ऑफ डिझाइन, संदीप युनिव्हर्सिटी हे आहेत.

कला, वाणिज्य, विज्ञान, मॅनेजमेंट, फार्मसी, आयटी, विधी, हेल्थकेअर, फॅशन डिझायनिंग, व्होकेशनल कोर्सेस, इंजिनिअरिंग व मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांतील करिअर, त्यातील संधींविषयीची माहिती तसेच अनेक संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांबद्दलची माहिती स्टॉलद्वारे विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. यामध्ये आठ प्रसिद्ध वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. 

एकविसाव्या शतकात आपल्या देशाची आर्थिक प्रगती गतीने होणार आहे. त्यामुळे भविष्यात कुशल व्यावसायिक मनुष्यबळाची (उदा. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, आर्किटेक्‍चर) गरज भासणार आहे. अशा व्यावसायिक कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांना नोकरी, संशोधन, स्वयंरोजगारात संधी उपलब्ध होतील. एकाच छताखाली सर्व अभ्यासक्रम, विविध महाविद्यालये, शिक्षण क्षेत्रातील संधी, यांची माहिती उपलब्ध करून देण्याचा ‘सकाळ’चा उपक्रम स्तुत्य आहे.
- डॉ. सुनील देशपांडे, प्राचार्य, मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग

रस्त्यावर मार्गक्रमण करताना दिशादर्शक फलक जसे आपल्याला मार्ग दाखविण्यास मदत करतात; त्याच पद्धतीने एज्यु. एक्‍स्पो विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये योग्य जागी पोचविण्यात मदत करतो. या एक्‍स्पोचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, मेडिकल, स्पर्धा परीक्षा यामधील प्रवेश, त्यासाठी असणारी क्‍लिष्टता, या गोष्टींचे ज्ञान एकाच ठिकाणी मिळते. करिअरबाबतची निर्णय प्रक्रिया येथे येऊन ते पूर्ण करू शकतात.
- प्रदीप खांदवे, कार्यकारी संचालक, झील एज्युकेशन सोसायटी 

या एक्‍स्पोमुळे करिअरचे अनेक पर्याय, वेगवेगळ्या कॉलेजेसची, शाखेची माहिती मिळणार आहे. युनिक ॲकॅडमी मुख्य प्रायोजक असल्यामुळे आता मुलांना स्पर्धा परीक्षांविषयी सखोल माहिती मिळणार आहे. पूर्वी स्पर्धा परीक्षा ही पदवीनंतर असते, असे विचाराधीन होते. परंतु, अलीकडच्या काळात बदल झाला आहे. या एक्‍स्पोमुळे स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करायची की नाही, कशी करायची, याबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या समुपदेशनाची प्रक्रिया पूर्ण होतेय; ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना निश्‍चित होतो. 
- मल्हार पाटील, संचालक, दी युनिक ॲकॅडमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Vidya Education Expo 2019 Student Career