शिक्षण, करियरचे पर्याय एकाच छताखाली

Sakal-Vidya-Expo
Sakal-Vidya-Expo

‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ उद्यापासून पिंपरी-चिंचवडमध्ये
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १) व रविवारी (ता. २) ऑटो क्‍लस्टर, सायन्स पार्कसमोर ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ होणार आहे. सकाळी १०  ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून, नामांकित शिक्षण संस्था त्यात सहभागी होणार आहेत.

प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर सेमिनार आयोजित केले आहेत. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, सहप्रायोजक युनिक ॲकॅडमी, सहयोगी प्रायोजक औद्योगिक शिक्षण मंडळ, डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्‍स, क्रिएटिव्ह ॲकॅडमी, मराठवाडा मित्रमंडळ हे आहेत. आउटडोअर पार्टनर धीरेंद्र आउटडोअर मीडिया सोल्यूशन प्रा. लि. हे आहेत. 

अनेक क्षेत्रांतील करिअर, त्यातील संधी या विषयीची तसेच अनेक संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांबद्दल माहिती स्टॉलद्वारे विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. पाच प्रसिद्ध वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय विद्यार्थ्यांचे वैयक्तिक समुपदेशनही केले जाणार आहे. विद्यार्थी व पालकांनी आवर्जून सहभागी व्हावे, अशी ही संधी आहे. या एक्‍स्पोचे वैशिष्ट्य म्हणजे तरुणांचे आयकॉन चेतन भगत चिंचवडमध्ये विद्यार्थ्यांना प्रथमच मार्गदर्शन करणार आहेत. ‘तुम्ही करिअरमध्ये सर्वोत्तम कसे बनू शकता’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.

हे स्पर्धेचे युग आहे. २१ व्या शतकात शिक्षणात विविधता व संधीचे क्षेत्रही विस्तारले आहे. यात पालकांना आपल्या पाल्याच्या शिक्षणासंदर्भात मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज आहे. ते ओळखून ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेला ‘सकाळ विद्या एक्‍स्पो २०१९’ हा उपक्रम पालक व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. मी या उपक्रमाचे हार्दिक स्वागत करतो. सध्याचे शिक्षण हे व्यवसाय, उद्योग व नोकरीच्या संधीशी मेळ घालणारे नाही. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल याबाबत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींच्या माध्यमातून विचार मंथन व्हावे. 
- कृष्णराव भेगडे, माजी आमदार, अध्यक्ष, महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, तळेगाव

जागतिक स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात कोणकोणते बदल घडत आहेत; तसेच कोणत्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला पाहिजे याबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन ‘सकाळ विद्या एक्‍स्पो’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तसेच पालकांना मिळते. अनेक क्षेत्रांतील माहिती एकच छताखाली मिळते. 
- रामदास काकडे, कार्यवाह, इंद्रायणी विद्या मंदिर 

‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘एज्युकेशन एक्‍स्पो’ हा चांगला उपक्रम सुरू केला आहे. या एक्‍स्पोमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शिक्षण क्षेत्रात कोणकोणत्या संधी आहेत, तसेच करिअरसंदर्भातील माहिती एकाच छताखाली मिळते ही अगदी स्वागतार्ह गोष्ट आहे.  
- डॉ. अरविंद खरात, चेअरमन, मेडिनोव्हा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कौन्सिल ऑफ पॅरामेडिकल सायन्स ऑफ इंडिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com