सर्व शैक्षणिक पर्याय व अभ्यासक्रमांची माहिती एकाच ठिकाणी 

सर्व शैक्षणिक पर्याय व अभ्यासक्रमांची माहिती एकाच ठिकाणी 

पुणे -  सकाळ माध्यम समूहातर्फे पिंपरी चिंचवड मध्ये शनिवार (ता.१) व  रविवार (ता.२) रोजी ऑटो क्‍लस्टर, सायन्स पार्क समोर ‘सकाळ विद्या एज्युकेशन  एक्‍स्पो’ होणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून नामांकित शिक्षण संस्थां या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. आर्टस, कॉमर्स, सायन्स, मॅनेजमेंट, फार्मसी, आयटी, लॉ, फॅशन डिझायनिंग, व्होकेशनल कोर्सेस, इंजिनिअरिंग व  मॅनेजमेंट इ. अनेक क्षेत्रातील करिअर, त्यातील संधी या विषयीची माहिती तसेच अनेक संस्थांमधील विविध  अभ्यासक्रमांबद्दल माहिती स्टॉलद्वारे विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. पाच प्रसिद्ध वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत  शिवाय विद्यार्थ्यांचे वैयक्तिक समुपदेशन ही केले जाणार आहे. 

या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुणांचे आयकॉन चेतन भगत चिंचवडमध्ये विद्यार्थ्यांना प्रथमच मार्गदर्शन करणार आहेत.  चेतन भगत लेखक म्हणून परिचित आहेत. टू. स्टेट्‌स, हाफ  गर्लफ्रेंड. ३ मिस्टेक्‍स ऑफ माय लाइफ अशा अनेक तरुणाईच्या लोकप्रिय पुस्तकाचे ते  लेखक आहेत. त्यांनी  अभियांत्रिकी पदवी आयआयटी येथून घेतली  ते सध्या तरुण व राष्ट्रीय विकास या विषयावर तरुणांना  मार्गदर्शन करतात. या प्रदर्शनामध्ये’तुम्ही करिअरमध्ये सर्वोत्तम कसे बनू शकता‘ हा त्यांच्या  व्याख्यानाचा विषय आहे. 

प्रदर्शनाचे प्रस्तुतकर्ता पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आहे.  प्रायोजक युनिक ॲकॅडमी व सहप्रायोजक औद्योगिक शिक्षण मंडळ, डॉ. डी. आय. पाटील एज्युकेशन कॉम्प्लेक्‍स,  क्रिएटिव्ह ॲकॅडमी, मराठवाडा मित्रमंडळ, आउटडोअर पार्टनर धीरेंद्र आउटडोअर मीडिया सोल्यूशन आहेत.

‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’
  कधी : शनिवार (ता.१ जून )    व  रविवार (ता.२ जून )
  वेळ : सकाळी १० ते रात्री ८
  कोठे : ऑटो क्‍लस्टर, सायन्स  पार्क समोर, चिंचवड
  अधिक माहितीसाठी संपर्क : ९८६०३०४०९७
  सेमिनार नोंदणीसाठी -   www.vidyaseminars.com

विषय : सिव्हिल सर्व्हिसेस करिअर आणि परीक्षा, यूपीएससी, एम्पीएससी अशा विविध स्पर्धा परीक्षा, या परीक्षांची तयारी कशी करावी. तसेच स्पर्धापरीक्षेत यशस्वी कसे व्हावे याविषयी मार्गदर्शन तुकाराम जाधव करतील. 
कोणासाठी उपयुक्त : स्पर्धापरीक्षा देणारे,. स्पर्धापरीक्षांसाठी उत्सुक असणारे सर्व विद्यार्थी. 
कधी : शनिवार, १ जून
केव्हा : सकाळी १२.०० वाजता


विषय : तुम्ही करिअरमध्ये सर्वोत्तम कसे बनू शकता.
करिअरची निवड कशी करावी. निवडलेल्या करिअरमध्ये सर्वोत्तम कसे बनाल. इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट असे अनेक करिअर ऑप्शन. त्याचप्रमाणे सध्याचे करिअर व भविष्यातील करिअरसंधी या विषयावर ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
कोणासाठी उपयुक्त : सर्वांसाठी, दहावी, बारावी तसेच पदवीचे विद्यार्थी व त्यांचे पालक. 
कधी : रविवार, २ जून
केव्हा : सकाळी ११.०० वाजता

विषय : करिअर इन प्युअर सायन्स ऑर रिसर्च
संशोधन कसे करता येते. निसर्गाच्या सानिध्यात राहून संशोधन कसे करावे? संकल्पना आधारित आणि विद्यार्थी केंद्रित तत्वांचा उपयोग करून अकरावी व बारावीचा अभ्यास कसा करावा. आयसर संस्थेत या सर्व संकल्पनांचा कसा वापर केला गेला आहे आणि त्याला आधुनिकतेची कशी जोड दिली गेली आहे या सगळ्या गोष्टींचा परामर्श ते आपल्या व्याख्यानात घेणार आहे. 
कोणासाठी उपयुक्त : दहावी ते बारावीचे विद्यार्थी व पालक
कधी : शनिवार १ जून
केव्हा : दुपारी ३.३० वाजता 

विषय : आर्ट, कॉमर्स, डिझाईन, लॉ, डिफेन्समधील करिअर. आर्टस्‌, कॉमर्स, सायन्स, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, डिझायनिंग, आर्किटेक्‍चर, मर्चंट नेव्ही, यांसारख्या विविध अभ्यासक्रमांची सखोल माहिती ते आपल्या व्याख्यानात देणार आहेत. 
कोणासाठी उपयुक्त : दहावी ते बारावीचे विद्यार्थी व पालक
कधी : रविवार, २ जून
केव्हा : दुपारी ३.३० वाजता

विषय : दहावीनंतरचे करिअर व राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक संस्था व त्यांची प्रवेशप्रक्रिया 
इंजिनिअरिंग व मेडिकलबरोबर इतरही करिअरचे पर्याय कोणते. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार वर्षभर दहावीच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शिक्षणसंस्था आणि त्यांची प्रवेशप्रक्रिया. या विषयावर मार्गदर्शन 
कधी : शनिवार १ जून 
केव्हा : संध्याकाळी ५.०० वाजता  

कोणासाठी उपयुक्त : आठवी ते दहावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com