‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’चे आज उद्‌घाटन

Sakal-Vidya-Education-Expo
Sakal-Vidya-Education-Expo

पुणे - ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ला शनिवारपासून (ता. १ जून) सुरवात होत आहे. एक्‍स्पोचे उद्‌घाटन सकाळी साडेअकरा वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन असतील. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पिंपरी- चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १ जून) व रविवारी (ता. २ जून) ऑटो क्‍लस्टर, सायन्स पार्कसमोर हा एक्‍स्पो असेल. सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून, नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, सहप्रायोजक युनिक ॲकॅडमी, सहयोगी प्रायोजक औद्योगिक शिक्षण मंडळ, डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्‍स, क्रिएटिव्ह ॲकॅडमी, मराठवाडा मित्रमंडळ हे आहेत; तर आउटडोअर पार्टनर धीरेंद्र आउटडोअर मीडिया सोल्यूशन प्रा. लि. आहेत. 

प्रदर्शनात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर सेमिनार आयोजित केले आहेत. विविध क्षेत्रांतील करिअर, त्यातील संधी याविषयीची माहिती; तसेच शिक्षण संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांबद्दल माहिती स्टॉलद्वारे विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. पाच तज्ज्ञ वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय विद्यार्थ्यांचे वैयक्तिक समुपदेशनही केले जाणार आहे.

आजचे वक्ते, विषय आणि वेळ
शनिवार, १ जून 
दुपारी १२ वाजता
    वक्ते : तुकाराम जाधव
     विषय : सिव्हिल सर्व्हिसेस करिअर आणि परीक्षा
    यूपीएससी, एमपीएससी या परीक्षांची तयारी कशी करावी; तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी कसे व्हावे, याविषयी मार्गदर्शन
      कोणासाठी उपयुक्त : स्पर्धा परीक्षा देणारे, स्पर्धा परीक्षांसाठी उत्सुक असणारे सर्व विद्यार्थी.

दुपारी ३.३० वाजता
      वक्ते : डॉ. अरविंद नातू
     विषय : करिअर इन प्युअर सायन्स ऑर रिसर्च
      कोणासाठी उपयुक्त : दहावी ते बारावीचे विद्यार्थी व पालक

संध्याकाळी ५.०० वाजता
      वक्ते : एन. ए. शेख
      विषय : दहावी-बारावीनंतरचे करिअर व राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक संस्था व त्यांची प्रवेशप्रक्रिया इंजिनिअरिंग व मेडिकलबरोबर करिअरचे इतर पर्याय, बदललेल्या अभ्यासक्रमानुसार दहावीच्या अभ्यासाचे नियोजन कसे करावे, अकरावी प्रवेश घेताना विषयांची निवड कशी करावी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित शिक्षणसंस्था आणि त्यांची प्रवेशप्रक्रिया. पुढील करिअरच्या दृष्टीने आठवीपासून फाउंडेशनची तयारी कशी करावी, अकरावी-बारावी बोर्ड व स्पर्धा परीक्षा यांचे दोन वर्षांत नियोजन कसे करावे, या विषयावर मार्गदर्शन कोणासाठी उपयुक्त : आठवी ते दहावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com