विद्यार्थी, पालकांसाठी शनिवारी शैक्षणिक पर्वणी

Sakal-Vidya-Education-Expo
Sakal-Vidya-Education-Expo

पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता.२) ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ आयोजित केले आहे. हा एक्‍स्पो विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी शैक्षणिक पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांकडून सर्व शैक्षणिक पर्याय  व अभ्यासक्रमांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. यात पालक व विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन संस्थाचालक व प्राचार्यांनी केले आहे.

पुणे-पिंपरी-चिंचवड शहर हे राज्यातील अग्रगण्य असे शिक्षणाचे अग्रणी केंद्रस्थान आहे. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आयोजित केलेल्या या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये विद्यार्थी व पालक यांच्यासाठी एकाच छताखाली विविध शैक्षणिक उपक्रम आणि करिअर करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी विविध वक्ते आणि मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांना शिक्षणाच्या योग्य दिशा ठरविता येणार आहेत.
- ज्ञानेश्‍वर लांडगे अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट.

‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या ‘एक्‍स्पो २०१९’ या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये विविध विषयाच्या अभ्यासक्रमांचे मार्गदर्शन होणार आहे. नुकताच १२ वीचा निकाल लागला आहे. त्यामुळे १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमाबरोबरच पदवीनंतरच्या स्पर्धा परीक्षांसाठी कोणत्या ॲकॅडमीमध्ये प्रवेश घ्यावा, याचे येथे मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे यामधून विद्यार्थ्यांना योग्य असेच मार्गदर्शन होणार आहे. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
- तुकाराम जाधव, संचालक, युनिक ॲकॅडमी.

‘सकाळ माध्यम समूह’ आयोजित ‘विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ हा विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळावे म्हणून ‘सकाळ’ नेहमीच प्रयत्नशील असते. ग्रामीण भागासह शहरी भागातीलही विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोचविण्याचे कार्यही ‘सकाळ’ प्राधान्याने करत आहे. वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रयत्नशील असलेल्या, जगभरामध्ये नाव झालेल्या आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशनल कॉप्लेक्‍सच्या वतीने ‘सकाळ’ आयोजित या शैक्षणिक प्रदर्शनास हार्दिक शुभेच्छा.
- डॉ. के. टी. जाधव, प्रवेश प्रमुख, डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्‍स, आकुर्डी, पुणे.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने नेहमीच विविध उपक्रम आयोजित केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ होय. या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये सर्व प्रकारच्या करिअरविषयक माहिती एकाच ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवायला मिळते. तसेच, विविध विषयांच्या तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्यानेही अनुभवता येतात. अशी काही करिअर आहेत की जी विद्यार्थी व पालकांना अद्यापीही माहिती नाहीत त्याही करिअरची माहिती येथे मिळते.
- एन. ए. शेख, डायरेक्‍टर, क्रिएटिव्ह ॲकॅडमी

एकाच छताखाली वेगवेगळे अभ्यासक्रम, विविध महाविद्यालये, भविष्यात उपलब्ध होणाऱ्या संधी यांची माहिती उपलब्ध करून देण्याचा दैनिक सकाळ यांचा उपक्रम स्तुत्य आहे. आपल्या देशाची आर्थिक प्रगती जोरदार गतीने सुरू आहे. त्यामुळे भविष्यात कुशल व्यावसायिक मनुष्यबळाची उदा. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी आदी क्षेत्रांत मोठी गरज भासणार आहे. असे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत व त्यांचे भवितव्य उज्ज्वल राहणार आहे.
- डॉ. सुनील देशपांडे, प्राचार्य, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी.

आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये विविध आंतरराष्ट्रीय उद्योगांसाठी योग्य मनुष्यबळ तयार करणे हे शिक्षण क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. दहावी, बारावीबरोबरच पुढील शिक्षण म्हणजे यशस्वी जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे. स्पर्धेच्या या युगात नेमके कोणते शिक्षण घ्यावे त्यातून पुढे कितपत संधी उपलब्ध आहेत. याबाबतची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. पीजी आणि युजी कोर्सेसमध्ये हॉरवर्ड बिझनेस सेंटर आणि आयआयएम बंगलोर यांसारख्या नामांकित शैक्षणिक संकुलांकडून ते सर्वांसाठी उपलब्ध आहे. त्यामाध्यमातून एसएपी ॲमेझॉनसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची संधी आहे.
- डॉ. संदीप पाचपांडे, अध्यक्ष, औद्योगिक शिक्षण मंडळ

औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या शहराची शैक्षणिक क्षेत्रातील वाटचाल उल्लेखनीय आहे. पिंपरी-चिंचवड शहर एज्युकेशन हब होत आहे. शहरात विविध प्रकारची अत्याधुनिक व भव्य शैक्षणिक संकुले होत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड व परिसरातील विद्यार्थ्यांना बाहेर न जाता शहरातच उत्तम शिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या शैक्षणिक प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी विविध शाखांची माहिती उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी.
- धनंजय वर्णेकर, अध्यक्ष, आयआयबीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट

शैक्षणिक क्षेत्रात पिंपरी-चिंचवड शहर अग्रेसर होत आहे. ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ च्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना भविष्यात कोणता शैक्षणिक अभ्यासक्रम निवडायचा, याबाबत माहिती मिळणार आहे. सध्या माहितीच्या युगामध्ये इंटरनेटवर माहिती मिळते. मात्र, सर्वांच्याच घरी साधनसामग्री उपलब्ध असेलच असे नाही. एकाच ठिकाणी विविध अभ्यासक्रमांची माहिती मिळणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांना भविष्याबाबत निर्णय घेणे सोयीचे जाईल. अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी या संधीचा लाभ घेतला पाहिजे. ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’  या उपक्रमास माझ्या शुभेच्छा.
- अभय कोटकर, अध्यक्ष, शिक्षण महर्षी डी. वाय. पाटील शिक्षण संस्था 

पूर्वी दहावीनंतर आयटीआय केले की नोकरी मिळत असे. आता स्पर्धेच्या युगात शिक्षण महत्त्वाचे आहे. मात्र, कोणते शिक्षण घ्यावे व त्यातून किती रोजगारांच्या संधी आहेत, याबाबतची सविस्तर माहिती पालक व विद्यार्थ्यांना मिळत नाही. नामांकित शिक्षण संस्थांमुळे आता पिंपरी-चिंचवड शहरही शिक्षणाची पंढरी झाली आहे. यामुळे पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडकडे विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’च्या माध्यमातून नामांकित संस्थांना सोबत घेऊन राबवत असलेला उपक्रम खरोखरंच कौतुकास्पद आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांना एकाच ठिकाणी विविध अभ्यासक्रमाची माहिती मिळणार आहे.
- डॉ. सुनील आडमुठे, प्राचार्य, इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲन्ड मॅनेजमेंट 

आपल्या मुलाला ठराविक शाखेत घालण्याकडे पालकांचा कल असतो. मात्र, असा अभ्यासक्रम शिकविणाऱ्या ठराविक शैक्षणिक संस्थाच पालकांना माहिती असतात. ठराविक महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, तर पालक व विद्यार्थी नाराज होतात. मात्र, ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’च्या माध्यमातून अभ्यासक्रमाची माहिती व प्रवेश एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने पालक व विद्यार्थ्यांची पायपीट थांबविली असून, त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
- दीपक शाह, सचिव, प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट 

प्रत्येक विद्यार्थ्याला विविध महाविद्यालयांत जाऊन प्रवेशप्रक्रियासंदर्भात माहिती घेणे शक्‍य नसते. निकाल लागल्यानंतर सर्वांचीच धावपळ सुरू होते. परंतु, ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’मुळे विद्यार्थी व पालकांना एकाच छताखाली विविध महाविद्यालये, विविध शाखांची सखोल माहिती मिळते. आपल्या आवडीनुसार शाखा निवड प्रवेशप्रक्रिया, शुल्क रचना या सर्वांची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी नक्की या प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे.
- नरेश चढ्ढा, संचालक, इनामदार चढ्ढाज्‌ सायन्स ॲकॅडमी

‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’च्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील विविध शंकांचे निरसन होत असते. योग्य शाखा निवड करणे विद्यार्थ्यांना अधिक सुलभ होते. ‘एज्युकेशन एक्‍स्पो’ उपक्रम उत्तम पद्धतीने आयोजित केला जातो. प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध वक्‍त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्याने होत असतात. ज्यात विद्यार्थ्यांना शाखा निवड व प्रवेशप्रक्रिया यांची इत्थंभूत माहिती मिळते. उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थी व पालकांनी या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी.
- मनीष मुंदडा, अध्यक्ष, साई बालाजी एज्युकेशन सोसायटी

आर्किटेक्‍चर क्षेत्रातील करिअरसाठी  द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षांची माहिती घेण्यासाठी अवश्‍य भेट द्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ हा स्तुत्य उपक्रम आहे. एकाच छताखाली विविध शाखांची माहिती विद्यार्थी व पालकांना मिळत आहे. वैविध्यपूर्ण माहिती असलेले एकमेव शहरातील शैक्षणिक प्रदर्शन आहे. दर वर्षी विद्यार्थ्यांचा कल या प्रदर्शनाला भेट देण्याकडे असतो. आमच्या संस्थेचा यात सहभाग ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. या प्रदर्शनास मनस्वी शुभेच्छा. 
- राजेश सप्रा, संचालक, एआयसीटी डीझाईन ॲकॅडमी 

‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’मुळे विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व प्रवेशप्रक्रिया व प्रवेश परीक्षेची माहिती उपलब्ध होणार आहे. निकाल लागल्यानंतर प्रत्येक पालकांना व विद्यार्थ्यांना सर्व महाविद्यालयांत जाऊन माहिती घेणे शक्‍य नसते. शैक्षणिक क्षेत्रात विविध बदल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची भविष्यातील वाटचाल अधिक सुलभ होण्याच्या दृष्टीने हे प्रदर्शन अधिक फायदेशीर असणार आहे. विद्यार्थी व पालकांनी या प्रदर्शनाला व व्याख्यानांना नक्की भेट द्यावी. या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा!
- आर. एस. यादव, अध्यक्ष, सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट 

नुकताच १२ वीचा निकाल लागला आहे. या अनुषंगाने शिक्षण व करिअरविषयी सारं काही एकाच छताच्या खाली पाहावयास मिळावे यासाठी ‘विद्या एक्‍स्पो २०१९’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा फायदा पिंपरी-चिंचवडकरांनी घ्यावा. कारण या उपक्रमात प्रसिद्ध लेखक, वक्‍ते, स्क्रीन प्ले, रायटर चेतन भगत यांचे उत्तम मार्गदर्शन आपल्या पिंपरी-चिंचवड शहराला लाभणार आहे. त्याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घेत आपल्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी करावा, त्यामुळे आपणास योग्य दिशा मिळणार ठरणार आहे.
- धीरेंद्र सेंगर, संचालक, धीरेंद्र आउटडोअर मीडिया सोल्यूशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com