‘सकाळ विद्या’चा आजपासून शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal vidya education expo 2022
‘सकाळ विद्या’चा आजपासून शुभारंभ

‘सकाळ विद्या’चा आजपासून शुभारंभ

पुणे - दहावी-बारावीनंतरच्या करिअर संधींची माहिती विद्यार्थी आणि पालकांना देण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’चे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. ३) सकाळी १०.३० वाजता होणार आहे. रविवारपर्यंत (ता. ५) हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअरच्या १०० हून अधिक संधींची माहिती एकाच छताखाली मिळेल.

पुण्यासह राज्यातील ३० हुन अधिक नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. यात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती देतानाच विद्यार्थी आणि पालकांसाठी तज्ज्ञांची मार्गदर्शनपर चर्चासत्रे होणार आहेत. दहावी-बारावीनंतर शिक्षणाच्या बहुविध पर्यायाची माहिती, याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, एव्हिएशन, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण यांसह अन्य अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी-पालकांना प्रदर्शनातून घेता येईल. त्याचबरोबर सीईटीसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही येथे मार्गदर्शन मिळेल.

विश्वकर्मा युनिर्व्हसिटी प्रस्तुत ‘सकाळ विद्या एक्स्पो २०२२’ला सिंबायोसिस स्किल्स ॲण्ड प्रोफेशनल युनिर्व्हसिटी, ‘एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी’चे सौजन्य आहे. तर, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिर्व्हसिटी आणि सृजन कॉलेज ऑफ डिझाईन यांचे सहयोग सौजन्य आहे.

आज याबाबत मार्गदर्शन

‘सकाळ विद्या एक्स्पो’मध्ये शुक्रवारी (ता. ३) एपीजी लर्निंगचे निनाद पानसे यांचे ‘२१ व्या शतकातील करिअर’ या विषयावर सकाळी ११.३० वाजता मार्गदर्शन होईल. तर, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिर्व्हसिटीचे प्रा. राहुल मनोहर हे ‘डिझाईन प्रोसेसमधील संधी’ या विषयावर सायंकाळी ५ वाजता विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करतील.

Web Title: Sakal Vidya Expo 2022 Start Today In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top