‘सकाळ’ इअर बुकचा फायदा - शेखर गायकवाड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

पुणे - स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्षात काम झालेल्या विषयांचेही ज्ञान आवश्‍यक आहे. मुलाखतीला आलेल्या विद्यार्थ्यांना विषयाचे विश्‍लेषण करणारा प्रश्‍न विचारला जातो. त्या वेळी प्रत्यक्ष ज्ञानाची, अनुभवाची मदत होते. यासाठी ‘सकाळ’तर्फे प्रकाशित केलेल्या ‘सकाळ इअर बुक २०१९’मुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहा महिन्यांचा वेळ वाचेल, एवढी माहिती यात आहे, असे मत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.

‘सकाळ इअर बुक २०१९’ या पुस्तक प्रकाशना वेळी गायकवाड बोलत होते. प्रकाशनाचे सरव्यवस्थापक आशुतोष रामगीर, संपादकीय व्यवस्थापक ऐश्‍वर्या कुमठेकर, उपसंपादक भूषण राक्षे, के सागर बुक हाउसचे अमोल गायकवाड, विकास बुक हाउसचे संकेत राजावाडा, शिवतेज बुक हाउसचे दिलीप भांडेकरी, आर्या बुक हाउसचे विजय अरसुड, ज्युपिटर बुक हाउसचे श्रीकांत भुतडा, रोहिणी बुकचे राजन प्रधान आदी उपस्थित होते. 

गायकवाड म्हणाले, ‘‘हे पुस्तक मराठी भाषेमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आणखी सोपे जाणार आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय पातळीवर करण्यात येणाऱ्या प्रयोगांचीही माहिती असणे जरुरीचे असते. त्यामुळे मुलाखतीच्या वेळी गोंधळ उडत नाही. वादग्रस्त विषयावर प्रश्‍न विचारल्यानंतर काय भूमिका घ्यावी, हा अनेक विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्‍न असतो. अशावेळी कोणतीही एक बाजू 
घेऊ नये.’’

विश्‍लेषणात्मक लेखांचा समावेश
‘सकाळ इअर बुक’मध्ये चालू घडामोडींसोबत ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक, राजकीय विश्‍लेषक, राजकीय व्यक्ती यांच्यासह विविध क्षेत्रातील अनुभवी अभ्यासकांचे विश्‍लेषणात्मक लेखही देण्यात आलेत.

Web Title: Sakal year Book 2019 Profit Shekhar Gaikwad